Karnataka Election 2023: गोवा, महाराष्ट्रातून कर्नाटककडे मतदारांचे लोंढे, सीमेवर हाय अलर्ट

कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व बसेस सीमेवर थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Dainik Gomantak

Karnataka Election 2023: कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी विविध पक्षांनी शेजारील राज्यांतील मतदारांना आणण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

गोव्यातील सत्ताधारी भाजपने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी 10 मे ही सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर कर्नाटक भागातील कन्नड लोक मोठ्या संख्येने राज्यात स्थायिक झाले आहेत. गोवा सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

गोव्यातून हजारो लोक उत्तर कर्नाटकात पोहोचत आहेत. सर्व बसेस भरल्या असून अधिकाऱ्यांनी चेकपोस्टवर दक्षता वाढवली आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून राजकीय पक्षांनी मतदारांसाठी बसेसची व्यवस्था केल्याच्या वृत्तानंतर अधिकारी सतर्क झाले आहेत.

गोव्यातून किमान 40 हजार कानडी मतदार कर्नाटक राज्यात रवाना झाले असून यापैकी निम्मे यापूर्वीच तेथे पोहोचले आहेत. राहिलेले मतदार मिळेल ते वाहन पकडून कर्नाटकात जात असताना दिसत होते. आज रात्री वास्कोहून हुबळीला निघालेल्या रेल्वेमध्येही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. म्हापसा बसस्थानकावर देखील कन्नड नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Karnataka Election 2023
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात आज पेट्रोल - डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या ताजे दर

मतदारांना त्यांच्या गावोगावी जाऊन मतदान करण्यासाठी पक्षांकडून भेटवस्तू आणि सवलती दिल्या जात असल्याची माहिती अधिकार्‍यांना मिळाली आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व बसेस सीमेवर थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

उत्तर कर्नाटक आणि किनारपट्टीवरील कर्नाटकातील लाखो लोक महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबईत स्थायिक झाले आहेत. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे. आणि निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.

Karnataka Election 2023
Karnataka Assembly Election 2023: 40 हजार मतदार कर्नाटककडे रवाना,राज्यातील उद्योगांवर परिणाम शक्य

गोव्यात भरपगारी सुट्टीवरून वाद

कर्नाटकातील मतदानास जाणाऱ्यांना गोवा सरकारने एका दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर केल्याने सध्या गोव्यात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. कर्नाटक देखील अशी सुट्टी देईल का असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.

दरम्यान, गोवा सरकारने लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 135 बी नुसार बुधवार 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘मतदान दिवस’ म्हणून कर्नाटक राज्याच्या मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com