CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : आयुर्वेद विद्यापीठाकडून मुख्यमंत्र्यांचा सन्मान !

आयुर्वेद परिषदेची बक्षिसी : दिल्ली दौऱ्यामध्ये नेत्यांच्या गाठीभेटी; अमित शहा, नड्डांशी केली चर्चा

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. आयुर्वेदासाठीच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

अर्थात, या दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. यात गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखभाई मांडवीय यांचा समावेश होता.

राज्यात विविध प्रश्न टीपेला पोहोचले असतानाच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज एकदिवसीय दिल्ली दौरा केला.

आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते विशेष फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

गोव्यात झालेली आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद यशस्वी पार पाडल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राजकीय चर्चा

आजच्या एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखभाई मांडवीय यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यांचा हा दौरा राजकीय असल्याचीही चर्चा आहे.

राज्यातील विविध प्रश्न केंद्रापुढे मांडणे, राज्यातील इतर विषयांचा आढावा सादर करणे आणि लोकसभा निवडणुकांची तयारी, यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT