Goa Crime News: ‘खंडणीराज’मुळे उत्तर गोवा हॉटेल व्यावसायिकांमध्ये दहशत, उच्चपदस्थांशी संधान?

खदखद वाढली : हॉटेल व्यावसायिकांनी पार्ट्यांना घातली मुरड : स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग
Money
Money Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: राजकीय हस्‍तक्षेपातून चाललेल्‍या खुलेआम ‘खंडणीराज’मुळे उत्तर गोव्यातील किनारी भागातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये जबरदस्‍त दहशत निर्माण झाली आहे. ‘प्रोटेक्शन मनी‘च्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकांकडून घेतल्या जाणाऱ्या खंडणीची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

‘प्रोटेक्शन मनी‘च्या नावे घेतला जाणारा पैसा हा मुख्यमंत्री कार्यालयाला आणि पक्ष संघटनेला द्यायचा असल्याचे सांगून गोळा केला जात आहे. या कथित खंडणीशी मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित व्यक्ती असल्याचे बोलले जात असून, या कथित उच्चपदस्थ व्यक्ती असल्याने त्यांना पोलिस संरक्षणही मिळत आहे.

‘प्रोटेक्शन मनी‘चा आकडा वाढत जात असल्याने आता अनेक व्यावसायिकांनी हॉटेलमधील पार्ट्याच बंद केल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

Money
MPA Goa: आमदार आमोणकरांनी दिला इशारा; 'एमपीए'च्या 9 नंबर गेटमधून बॉक्साईट वाहतूक झाली बंद

अनेक हॉटेलांमध्ये विविध प्रकारचे व्यवहार चालतात. त्याशिवाय अनेक हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत पार्ट्या सुरू असतात, हे माहीत असल्याने अशा हॉटेल व्यावसायिकांना हेरून त्यांच्याकडून ‘प्रोटेक्शन मनी‘ घेण्याचा प्रकार सुरू आहे.

विशेष बाब म्हणजे, सध्या या खंडणीमागे जी नावे चर्चेत आली आहेत, त्‍यात तेंडुलकर आणि पाडलोस्‍कर यांचा समावेश आहे. दोघेही पोलिस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन व्‍यावसायिकांना धाक दाखवत असल्‍याची माहिती आहे.

व्यावसायिकांना धमकावण्यासाठी पोलिसांची मदत

मुख्यमंत्र्यांना आज भेटणार!

किनारी भागातील काही हॉटेल व्यावसायिक या कथित खंडणी प्रकाराबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शुक्रवारी भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने ते शुक्रवारी गोव्यात परतणार आहेत.

त्यानंतर त्यांची हे व्यावसायिक भेट घेऊन चाललेल्या प्रकाराची माहिती देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून सुरू असलेला हा कथित खंडणीचा प्रकार आता कोणत्या वळणावर पोहोचणार, हे लक्षात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये नुकतेच पर्यटकांसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Money
Goa Traffic: तिब्बल सीट निघाले म्हणून पोलिसांनी अडवले; तर वेगळेच सत्य आले बाहेर...

सुरुवातीला संबंधित व्यक्तीला काही रक्कम देण्याचे व्यावसायिकाने मान्य केले होते. परंतु ही रक्कम वाढत गेली, शिवाय त्या व्यक्तीने म्हणे हॉटेलमध्ये पोलिस ठेवले. त्यामुळे संबंधित हॉटेल व्यावसायिकाने पार्टीसाठी घेतलेले बुकिंग रद्द करून ती रक्कम परत केली.

परिणामी त्या हॉटेल व्यावसायिकाला पार्टी आयोजनाचा प्रकार ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असा पडला. त्यामुळे या व्यावसायिकांनी ही पार्टी आयोजित करणे सोडून दिले आहे.

तेंडुलकर, पाडलोस्‍कर, गावस कोण?

कथित खंडणीच्या प्रकारात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली पाडलोस्कर आणि तेंडुलकर आडनाव असलेल्या व्यक्ती असल्याचे पुढे आले आहे. आता त्यात ‘गावस’नामक व्यक्तीचीही भर पडली आहे.

पेडण्यात किनारी भागात ‘कलेक्टर’ म्हणून हा व्यक्ती काम करतो. सरकारी पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे कामही हाच ‘कलेक्टर’ करतो.

या ‘कलेक्टर’चा दिवसेंदिवस मागणीचा आकडा वाढत असल्याने पार्टी आयोजन करणेच बंद केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि पक्षाच्या इतर उपक्रमांतही सक्रिय असणारेही यात सामील असल्याचे बोलले जाते.

बनावट सह्यांचा वापर

खंडणी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रारीसाठी बनावट सह्यांचा वापर केला, अशा तक्रारी किनारी भागातील काही व्यावसायिकांनी गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांकडे दाखल केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com