CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: अपघात टाळण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचा 15 दिवसांत अहवाल तयार करणार; CM प्रमोद सावंत

गोव्यात नव्या रस्त्याची आणि पुलांची कामे झाली असून वाहतूकही वाढली आहे. अपघातांचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत खूप वाढले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांचा 15 दिवसांत अहवाल तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच सूचनांची अंमलबजावणी वाहतूक पोलीस आणि पीडब्ल्यूडी येत्या 1 डिसेंबरपासून करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

(Chief Minister Dr. Pramod Sawant statement on goa accident)

या कार्यक्रमात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यास खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित रहाणार असल्याचे वाहतूक उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी माहिती दिली होती. या वेळी वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर , सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता डी. सी. गुप्ता व अधीक्षक अभियंता (राष्ट्रीय महामार्ग विभाग) एलन परेरा उपस्थित होते.

गोव्यात नव्या रस्त्याची आणि पुलांची कामे झाली असून वाहतूकही वाढली आहे. अपघातांचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत खूप वाढले आहे. यावर एक ठोस आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने जनसुनावणी घेऊन सर्व समावेशक उपाययोजना आखायच्या आहेत. त्यासाठी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

30 सप्टेंबरपर्यंत 2244 अपघात, 179 जीवघेणे

यंदाच्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत 2244 एवढे अपघात झाले. ज्यात जीवघेण्या 179 अपघातांत 179 जणांना मरण आले. याच 9 महिन्याच्या काळासाठी गतवर्षी 153 मृत्युमुखी पडले होते. यंदा त्यात 42 ने वाढ झाली. या वर्षी 3 लाख 87 हजार 629 जणांना चलन देण्यात आले. त्यातून 13 कोटी 46 लाख 11 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला.

चूक कुणाची उघडपणे बोला: सातार्डेकर

काही रस्ते असुरक्षित असल्याचा नेहमी आरोप होतो. त्यात कोणती दुरुस्ती हवी, ते कळवावे. ब्लॅक स्पॉट लक्षात आणून द्यावेत. चूक कोणाची ते उघडपणे बोलावे, असे आवाहन वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर यांनी केले.

वाहन अपघातांची खरी कारणे उघड व्हायला हवीत. वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई हवी, तर जनतेनेच सुचवावे असे ते म्हणाले. दुचाकी चालकांबरोबर मागे बसणाऱ्या स्वारालाही हेल्मेट सक्ती असावी का, असे त्यांना विचारले अस्ता त्यावर जनतेने कौल द्यावा, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT