Verna Museum: वेर्णा येथे अत्याधुनिक संग्रहालय उभारणार

गोव्यातील प्राचीन हिंदू संस्कृतीची माहिती संवर्धित व्हावी - मंत्री सुभाष फळदेसाई
Subhash Phal Dessai
Subhash Phal DessaiDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील प्राचीन हिंदू संस्कृतीची माहिती संवर्धित व्हावी, अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी वेर्णा येथील महालसा मंदिरात अत्याधुनिक कला संग्रहालय उभारण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. फळदेसाई यांनी नुकतीच वेर्णा येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

(Shubash Phal Dessai informed Hindu culture Art Museum will be set up at Mahalasa temple Verna )

संग्रहालयाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, हे संग्रहालय नेमके कसे असेल? याबाबत एक आराखडा तयार करण्यात आला आहे. यात अजून काही अपडेट करता येईल का? याच्यावरही तज्ज्ञांच्या मदतीने विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.

Subhash Phal Dessai
Dabolim Airport : येत्या दिवाळीत दाबोळी विमानतळाचेच उड्डाण; गोव्यावर काय परिणाम?

या संग्रहालयामध्ये गोवा राज्यात सापडलेल्या शेकडो वर्षापूर्वीच्या मुर्ती, वेगवेगळ्या राजवटीत सापडलेले ऐतिहासिक शिलालेख यांची कोणत्या पद्धतीने मांडणी करावी याबाबत ही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. गोव्यात येणारे पर्यटक या ठिकाणी भेट देत हा इतिहासाचा अमूल्य ठेवा पाहून जातील असे ही ते यावेळी म्हणाले.

Subhash Phal Dessai
CM pramod sawant: 'या' तारखेपर्यंत कला अकादमी गोवेकरांसाठी असेल सज्ज

मंत्री फळदेसाई म्हणाले की, सध्या मी माहिती घेत असून राज्यात कोणत्या कोणत्या प्रकारची मंदिरे आहेत त्यांचं बांधकाम कोणत्या शतकातील आहे. या मंदीरांचे वेगळेपण काय आहे? याबाबत तज्ज्ञांच्याकडून माहिती घेत संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं ते म्हणाले. गोवा राज्य पुरातत्व विभागाच्या मदतीने या संवर्धनाचे काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com