Sea Dainik Gomantak
गोवा

Goa News: पाणीपातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया! गोव्यातील किनारपट्टींचा अभ्यास सुरू

Goa Beaches: राज्य सरकार सध्या गोव्यातील सर्व किनारपट्टीतील भागांचा अभ्यास करीत असून त्यासाठी सरकारने चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट एजन्सीची नियुक्ती केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: माजोर्डा किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. त्यामुळे शॅक्स उद्ध्वस्त झाले आहेत. या बद्दल बोलताना मंत्री आलेक्स यांनी सांगितले की, माजोर्डा किनाऱ्यावर वर्षांतून तीन वेळा म्हणजे जुलै, ऑक्टोबर व डिसेंबर मध्ये पाणी वर येतेच. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

आज पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यानी या एजन्सीच्या अधिकाऱ्यांसमेवत उतोर्डा व माजोर्डा किनाऱ्यांची पाहणी केली.

या एजन्सीने या पुर्वी या भागाचे सर्वेक्षण केले आहे आता त्यानी प्रत्यक्ष पाहणी करुन अभ्यास सुरु केला आहे. अभ्यास केल्यावर ते अहवाल सादर करतील. आम्ही सुद्धा त्यांच्या अहवालाची वाट पाहू व त्यांच्या शिफारसींचा अभ्यास करू असे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

किनारपट्टीची माजोर्ड्यात पाहणी

राज्य सरकार सध्या गोव्यातील सर्व किनारपट्टीतील भागांचा अभ्यास करीत असून त्यासाठी सरकारने चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीचे अधिकारी सध्या गोव्यात असून त्यानी उतोर्डा व माजोर्डा किनारपट्टीपासून अभ्यास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT