Sanguem News: मला न्याय द्या! घर वाचवण्यासाठी महिलेचा आक्रोश; आझाद मैदानावर मदतीसाठी उपोषण

Sanguem Dhangar Women Protest At Azad Maidan: पिकास व इतर अवजारे घेऊन मला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यासंबंधी मी तक्रार करून देखील मला योग्य तो न्याय दिला जात नाही. यामुळे सरकारने मला न्याय द्यावा यासाठी आझाद मैदानावर उपोषण बसलेल्या धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक बमी झोरे यांनी सांगितले.
Sanguem Dhangar Women Protest At Azad Maidan: पिकास व इतर अवजारे घेऊन मला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यासंबंधी मी तक्रार करून देखील मला योग्य तो न्याय दिला जात नाही. यामुळे सरकारने मला न्याय द्यावा यासाठी आझाद मैदानावर गुरुवारी उपोषण बसलेल्या धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक बमी झोरे यांनी सांगितले.
Sanguem Dhangar Women Protest At Azad Maidan To Save Home Dainik Gomantak
Published on
Updated on

75-Year-Old Woman Protests to Save Home in Sanguem

पणजी: सरकारने जो २० कलमी कार्यक्रम राबविला होता, त्या कार्यक्रमाअंतर्गत मला जागा मिळाला होती व त्या जागेत मी १९९४ साली घर बांधले. परंतु आता या जागेत वास्तव्य करण्यास शेजाऱ्यांकडून मला त्रास केला जात आहे. पिकास व इतर अवजारे घेऊन मला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यासंबंधी मी तक्रार करून देखील मला योग्य तो न्याय दिला जात नाही. यामुळे सरकारने मला न्याय द्यावा यासाठी आझाद मैदानावर गुरुवारी उपोषण बसलेल्या धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक बमी झोरे यांनी सांगितले.

यावेळी उषा नाईक उपस्थित होत्या. झोरे यांनी सांगितले की, शेजाऱ्यांकरवी होणाऱ्या त्रासाबाबत मी पोलिस स्थानकात तक्रार दिली. स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांना देखील भेटले, परंतु न्याय मिळालेला नाही. सर्कल इंस्पेक्टर कारवाई करण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. माझी नात विरोधी गटाचा प्रचार करत होती, त्यामुळे मला मदत करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता सरकारने आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी बमी झोरे यांनी यावेळी माध्यमांकडे बोलताना केली.

शेजाऱ्यांकरवी नाहक त्रास; झोरे

मी आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. मला दोनदा हृदयविकाराच्या झटका येऊन गेला आहे. माझ्या मुलींचे लग्न करून दिल्याने आता मी घरात एकटीच असते, परंतु माझ्या शेजाऱ्यांकरवी मला नाहक त्रास देत धमकाविले जाते. मला पिकास घेऊन मारण्यासाठी अंगावर येतात. माझे घर हिसकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी मला कुणाचा आधार नाही, त्यामुळे सरकारने मला न्याय द्यावा व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी बमी झोरे यांनी केली.

Sanguem Dhangar Women Protest At Azad Maidan: पिकास व इतर अवजारे घेऊन मला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यासंबंधी मी तक्रार करून देखील मला योग्य तो न्याय दिला जात नाही. यामुळे सरकारने मला न्याय द्यावा यासाठी आझाद मैदानावर गुरुवारी उपोषण बसलेल्या धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक बमी झोरे यांनी सांगितले.
Anjuna News: दुर्दैवी! बांधकाम स्थळावरून पडून मजुर दगावला; हणजूण येथील घटना

कवळेकरांनी घेतली भेट

मी धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून येथे तिची तक्रार जाणून घेण्यासाठी आलोय. यात कोणतेच राजकारण नाही. या प्रकरणात नेमके काय झाले आहे ते मी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन याबाबत कारवाई केली जाईल. जर गरज भासल्यास याबाबतीत मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी देखील चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच धनगर समाजाचे नेते बाबू कवळेकर यांनी सांगितले. दरम्यान आझाद मैदानावर भेट देत महिला कॉंग्रेसच्या नेत्या बीना नाईक व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com