Goa RTO Police  Dainik Gomantak
गोवा

फोंडा आरटीओ कार्यालयात अनागोंदी कारभार

सुविधांअभावी गैरसोय : वाहतूक परवाने वेळेत देण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यातील वाहतूक कार्यालयात सध्या काही सुविधांचा अभाव जाणवत असून कर्मचारी नाहक कामात चालढकल करतात,असा दावा वाहन चालकांकडून होत आहे. वाहनचालक परवाने देण्यासाठी होणारी दिरंगाई टाळण्याची आणि अनागोंदी कारभारात सुधारणांची गरज आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीमुळे या कार्यालयातील गर्दी बरीच कमी झाली असली तरी तेथील कर्मचारी, वाहतूक अधिकाऱ्यांनी चालकांची कामे तातडीने करावीत,अशी मागणी होत आहे.

(Chaos in the ponda RTO office)

या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जिथे कर वा रक्कम भरणा करण्यासाठी लोक बसतात, तिथे फक्त एकच पंखा कार्यरत असल्याचे दिसून येते. या एकमेव पंख्यामुळे लोकांची उकाड्याने जीवाची घालमेल होताना दिसते.

सध्या उन्हाचे चटके सहन तिथे बसावे लागते,अशी अनेकांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर जे वाहतूक परवान्याकरिता दिलेली परीक्षा पास होतात, त्यांना निर्धारीत काळात हा परवाना मिळायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. खासकरून सुरुवातीला दुचाकी वाहनाचा परवाना काढलेल्या ग्राहकांना नंतर चारचाकी वाहनाची परीक्षा पास झाल्यावर या गोष्टीचा अनुभव येतो. अशा ग्राहकांना दोन्ही प्रकारची वाहने चालवण्याचा एकच परवाना मिळणार असल्यामुळे दुचाकीचा परवाना वाहतूक कार्यालयाला परत करावा लागतो. आणि वेळेत परवाना न मिळाल्यास त्यांना चारचाकी सोडा पण परवाना असलेली दुचाकी वाहनेही चालवायला मिळत नाहीत.

सध्या वाहतूक कार्यालयात फक्त डेबिट कार्ड (एटीएम)द्वारे पैसे घेतात. रोख व्यवहार संपूर्णपणे बंद असल्यामुळे ज्यांच्याकडे अशी कार्डे नाहीत, त्यांची पंचाईत होते. त्यामुळे रोख रक्कम घेण्याची तरतूद असावी, अशी मागणी केली जात आहे.

या कार्यालयात बहुतेक फलक हे इंग्रजीत असल्यामुळे ज्यांना इंग्रजी कळत नाही. त्यांची घालमेल होते. त्यामुळे इंग्रजीबरोबरच मराठी व कोकणीतही हे फलक असावेत, अशी चालकांची मागणी आहे.

परवाने किती दिवसात मिळणार त्याचा तक्ता वाहतूक कार्यालयात असायला हवा. आणि केवळ तक्ता असून चालत नाही. पण त्याची अमंलबजावणी त्या तक्त्याप्रमाणे व्हायला हवी. कारण परवाना नसल्यास वाहतूक पोलिस लगेच दंड आकारतात. आणि सध्या दंडाची रक्कम भरमसाठ झाल्यामुळे या ग्राहकांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ अशी होते.

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी फोंड्यातील कार्यालयाला अनपेक्षित भेट देऊन या कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा एकदा आढावा घ्यावा, असे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. अजूनही तिथे ‘एजंट राज’ दिसत असल्यामुळे वाहतूक मंत्र्यांची भेट ही अनिवार्य आहे,असे मत तिथे कामासाठी आलेल्या ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT