सी. टी. रवी सायरन वाजवत येतात तेव्‍हा...

भुवया उंचावल्या : विधानसभा निवडणुकीतही सायरनधारी पोलिस सुरक्षा व्‍यवस्‍था
C T Ravi
C T Ravi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेसच्‍या मार्गारेट आल्‍वा, दिनेश गुंडू राव यांच्‍यापासून भाजपचे देवेंद्र फडणवीस, रुपाल, आरती मेहता असे दिग्गज नेते पक्षांचे प्रभारी म्‍हणून गोव्‍यात आले. परंतु त्‍यांनी कधी सायरनधारीत एक्‍सॉर्ट घेतला नव्‍हता. त्‍यामुळे भाजपचे सध्‍याचे प्रभारी सी. टी. रवी हे जेव्‍हा गोव्‍यात सायरन असलेली सिक्‍युरिटी गाडी वापरतात तेव्‍हा गोमंतकीय जनतेच्‍या भुवया उंचावणे स्‍वाभाविकच.

C T Ravi
गोव्यात कुणी उपाशीपोटी राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील: रवी नाईक

‘सी. टी. रवी यांना झेड दर्जाची सिक्‍युरिटी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली आहे. त्‍यामुळे आम्‍हाला अधिकृतपणे त्‍यांना सायरनधारीत एक्‍सॉर्ट गाडी द्यावी लागली’ अशी माहिती गोव्‍याच्‍या एका ज्‍येष्‍ठ सुरक्षा दल संबंधित पोलिस अधिकाऱ्याने दिली. परंतु सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील वारसन यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना ‘मी कुणाला अशी मान्‍यता दिलेली नाही’ असे स्‍पष्‍ट केले.

रवी यांनी काही वादग्रस्‍त विधाने केली आहेत. विशेषत: ‘देशाच्‍या गद्दारांना गोळ्‍या घाला’, असे विधान त्‍यांनी केले होते. त्‍यामुळे रवी भलतेच प्रकाशात आले. त्‍यांना गोवा विधानसभा निवडणुकीच्‍या काळातही सायरनधारीत पोलिस सुरक्षा व्‍यवस्‍था देण्‍यात आली होती. गोव्‍याच्‍या गृहमंत्र्यांच्‍या सूचनेवरूनच अशी सायरनधारीत सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते. दरम्यान, गोवा राज्‍याच्‍या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय आढावा घेण्‍यासाठी सी. टी. रवी आज बुधवारी गोव्‍यात आले आणि रात्री ते आपल्‍या राज्‍याकडे रवाना झाले. या बैठकीत त्‍यांनी भाजपची सुकाणू समिती, मंत्री व आमदारांची बैठक घेतली. नरेंद्र मोदी यांच्‍या पंतप्रधानपदाच्‍या कारकिर्दीला 30 मे रोजी आठ वर्षे पूर्ण होत असून त्‍यानिमित्त विविध उपक्रमांचा पंधरवडा साजरा करण्‍यात येणार आहे. गोव्‍याच्‍या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्‍याचे काम प्रामुख्‍याने या बैठकीत करण्‍यात आले.

C T Ravi
मडगाव मासळी मार्केटमधील क्रेट्स चोरून भंगारात विकल्या!

सध्‍या सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या आदेशामुळे मुख्‍यमंत्री वगळता कोणालाही सुरक्षाकवच नाही. तसेच लाल दिव्‍याची गाडी, सायरनधारीत पोलिस सिक्‍युरिटी घेऊन फिरता येत नाही. केंद्रीय मंत्र्यांना मात्र सिक्‍युरिटी मिळू शकते. ‘मला इतर राज्‍यांत सायरनधारीत सुरक्षा वाहन मिळते, तेव्‍हा गोव्‍यातही ते उपलब्‍ध व्‍हावे’ अशी विनंती स्‍वत: सी. टी. रवी यांनी राज्‍य सरकारला केली होती. यासंदर्भात ‘गोमन्‍तक’ने मुख्‍यमंत्र्यांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते कामात व्‍यस्‍त होते.

सी. टी. रवी यांना मुळात झेड सिक्‍युरिटी आहे का, याबद्दल अनेकांनी अनभिज्ञता व्‍यक्त केली. कर्नाटकच्‍या काही आमदारांशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ‘रवी यांना अशी सुरक्षा का देणे आवश्‍‍यक आहे? अशी सुरक्षा त्‍यांना दिल्‍याचे आम्‍हाला तरी ठाऊक नाही’, अशी माहिती दिली. सी. टी. रवी हे कर्नाटकचे केवळ आमदार आहेत.

2018 मध्‍ये सी. टी. रवी यांना गुप्‍तचर विभागाच्‍या सूचनेवरून ‘एक्‍स’वरून ‘वाय’ पद्धतीची पोलिस सुरक्षा देण्‍यात आली होती. पोलिस सूत्रांच्‍या मते, ‘वाय’ सिक्‍युरिटी असलेल्‍या नेत्‍यांना सायरनधारीत पोलिस सुरक्षा वाहन दिले जात नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com