Inaugurating the camp, Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Bicholim : नियमित आरोग्य तपासणी करा - चंद्रकांत शेट्ये

चंद्रकांत शेट्ये : डिचोलीत रूग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करावी. असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. डिचोली भाजप मंडळातर्फे बुधवारी (ता.12) आयोजित डिचोली मतदारसंघ मर्यादित मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्‍घाटन केल्यानंतर डॉ. शेट्ये बोलत होते. भाजप सरकार हे अंत्योदय तत्त्वावर वावरत आहे. आरोग्य क्षेत्रातही या सरकारचे कार्य उल्लेखनीय आहे. असे मतही डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केले.

डॉक्टर माधव लेले, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, वल्लभ साळकर, तुळशीदास परब आदी उपस्थित होते. परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे, असे डॉ. माधव लेले यांनी यावेळी बोलताना सांगून भाजपचे सरकार हे परोपकारी असल्याचे मत व्यक्त केले. विश्वास गावकर यांनी स्वागत केले. डॉ. पाटणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणार

दीनदयाळ सभागृहात हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात व्हिजनच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र, मधुमेह, ब्लड शुगरसह आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात आढळून आलेल्या गरजू रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT