शिवसेना पक्षाचे चिन्ह Dainik Gomantak
गोवा

Chandrakant Bandekar case: पोलिस स्टेशनवर शिवसेना पेडणेतर्फे धरणे आंदोलन

चंद्रकांत बांदेकर या 55 वर्षीय नागरिकाचा दिवसा ढवळ्या खून होवून 15 दिवस उलटले तरीही आज पर्यंत पेडणे पोलिसांनी संशयिताना पकडले नाही.

दैनिक गोमन्तक

मोरजी: सक्राळ तोरसे येथील रेती व्यावसायिक चंद्रकांत बांदेकर (Chandrakant Bandekar) या 55 वर्षीय नागरिकाचा 2 तारखेला दिवसा ढवळ्या खून (Murder case) होवून 15 दिवस उलटले तरीही आज पर्यंत पेडणे पोलिसांनी (Pernem Police) संशयिताना पकडले नाही , जर चार दिवसाच्या आत संशयिताना पेडणे पोलिसांनी पकडले नाही तर शिवसेना (ShivSena) पेडणे पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार असा इशारा पेडणे शिवसेने तर्फे राज्य उपाध्यक्ष सुभाष केरकर (Subhash Kerkar) यांनी पत्रकार परीशाधेत दिला. (Chandrakant Bandekar case: Agitation by Shiv Sena Pernem at police station)

मालपे पेडणे येथे आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परीशाधेला घनश्याम प्रभुदेसाई ,ओंकार प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. चंद्रकांत बांदेकर यांचा खून 2 जुलै रोजी झाला . त्यावेळी त्यांची दुचाकी जी ए एफ 7142 हे वाहन घटनास्थळी सापडले होते. चंद्रकांत यांचा मृतदेह हेल्मेट परिधान केलेल्या स्थितीत सापडला होता , त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले होते.

त्याचा कुणी ,कोणी व का खून केला याचा तपास 15 दिवस पेडणे पोलीस लावत आहे .मात्र अजुन्पारायात ठोस पुरावे हाती सापडलेले नाहीत , चंद्रकांत बांदेकर हे तुये येथील एका हॉटेलात वारंवार जायचे त्याठिकाणी पोलीस जावून काही धागेदोरे मिळतात कि ते पाहत आहे . या खुनाचा तपास लावण्यासाठी पेडणे पोलीस स्टेशनवर दोन उपाधीक्षक , गजानन प्रभुदेसाई व संदेश चोडणकर , म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हेही उपस्थित राहून पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना मार्गदर्शन केले

उद्या गुरूवारी दिनांक 29 जुलै 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता पोलिस स्टेशनवर पेडणे येथे शिवसेना पेडणेतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सक़ाळ तोरशे येथील चंद्रकांत बांदेकर यांची हत्याप्रकरणी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी केली जाणार आहे. पेडणेकर जबाबदार नागरीक आणि मयत बांदेकर कुटूंबियांच्या हितचिंतक तथा मित्रांना सहभागी होण्याचे शिवसेनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

Indian Cricketer Viral Chat: शर्टलेस फोटो अन् खासगी चॅट व्हायरल! टीम इंडियाचा खेळाडू चर्चेत; क्रिकेट विश्वात खळबळ

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

SCROLL FOR NEXT