Goa: पेडणे तालुक्यात ३० लाखांचे नुकसान

१२० हेक्टर भातशेती तसेच केळी बागायत नष्‍ट, शेतकऱ्यांचे श्रम वाया (Flood in Goa)
Goa: Banana Tree Fallen in Pernem, Goa.
Goa: Banana Tree Fallen in Pernem, Goa.Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : पुरामुळे (Flood in Goa) पेडणे (Pernem, Goa) तालुक्यातील भात शेती आणि केळी बागायतीचे किमान ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी दिली. त्यात १२० हेक्टर भात शेती व १० हेक्टर केळी बागायत नष्‍ट झाली आहे. कोरोनावर मात करून मोठ्या कष्‍टाने भात शेती आणि केळीची बागायत शेतकऱ्यांनी केली होती. परंतु, निसर्गाने झोडपले तर कुणाकडे दाद मागणार, अशी केविलवाणी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सुमारे ३५ वर्षांनंतर पुन्‍हा पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीकिनारी भागातील इब्रामपूर, हणखणे चांदेल, हसापूर, कासारवर्णे, शिरगाळ-धारगळ आणि तुये या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्‍यात ३० लाख रुपयांहून जास्त नुकसानी झाल्याचा अंदाज आहे.

Goa: Banana Tree Fallen in Pernem, Goa.
Goa Flood: 'का ग आम्हावर कोपली...' पुराच्या पाण्यात गेला संसार वाहून

जोरदार पाऊस आणि तिळारी प्रकल्पाचे (Tilari Dam) सोडलेले पाणी याचा फटका पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा नदीच्या किनारी भागातील स्थानिकांना बसला. या दोन्ही दोन्ही नद्यांना पूर आला आणि या पुराने आपल्या परिसरातील शेतजमिनी, केळी बागायतीचे नुकसान झाले. त्‍यामुळे अनेक कुटुंबांचे उत्‍पन्नच नष्‍ट झाले. शिवाय, घरात पाणी घुसल्‍याने अनेक कुटुंबे निराधार झाली. त्‍यांना शेजाऱ्यांचा, नातेवाईकांचा आधार, आसरा घ्यावा लागला. उत्‍पन्नाचे साधन गेल्‍यामुळे अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आम्हांला मदत कधी मिळणार हे माहीत नाही. केवळ तुटपुंजी मदत देऊन संसार उभा होणार नाही. खास मदतीचे पॅकेज द्यावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसानभरपाई देण्यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश त्‍यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

केळीला गणेश चतुर्थीवेळी असते मागणी

भात शेतीत एक हेक्टर मध्ये उत्पादन घेण्‍यासाठी सरासरी ५० हजार रुपये खर्च येतो. पुरामुळे १२० हेक्टर भात शेतीतील उत्पन्न गेले आहे. पेडणे तालुका हा कृषिप्रधान तालुका आहे. येथील युवा पिढीनेही शेती व्यवसायात लक्ष घातले आहे. आधुनिक यंत्रांचा वापर करून भात शेती लागवड करण्‍यासोबतच काजू कलमे, आंबे शिवाय मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली होती. या केळीला गणेश चतुर्थीच्‍या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, आता पुरामुळे हे उत्‍पन्नच नष्‍ट झाले आहे.

Goa: Banana Tree Fallen in Pernem, Goa.
Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com