Rain
Rain  Dainik Gomantak
गोवा

पुढील काही दिवसात गोव्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : गेले काही दिवस सायंकाळच्या वेळी गोव्यात काहीसं ढगाळ वातावरण असुन, हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला असुन 8 ते 13 मे दरम्यान गोव्यात वातावरणात ढगाळ असेल, कारण पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे ते ढगाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Chance of light showers in Goa in next few days )

तसेच पुढील 4 ते 5 दिवस हे वातावरण कायम राहील अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच 10 मे पासून गोव्यातील उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. त्यामूळे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील पुढील काही दिवसात वातावरण ढगाळ असेल तसेच पावसाची हजेरी लागणार हे निश्चित.

एप्रिलमध्ये ही राज्यात पावसाची हजेरी

गोवा राज्यात 24 एप्रिल रोजी राज्यात कमाल 34.2 तर किमान 27.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच राज्यात 27 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली होती. एप्रिल मधील सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती जी सामान्य तापमानापेक्षा 2.9 अंश सेल्सिअस अधिक होते.

तसेच 1989 पासुन आजतागायत पणजीत एप्रिल महिन्यातील सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेने म्हटले आहे, तर त्या खालोखाल 6 एप्रिल 1997 रोजी मडगाव येथे 37.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ढगाळ पण कोरडे वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

Goa Crime: राज्यात चोर, हल्लेखोरांचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था ढासळली! काँग्रेसचा घणाघात

Former MLA Mickky Pacheco: मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा? असं का म्हणाले माजी आमदार मिकी पाशेको

Goa News: रस्त्यावर गुडघे टेकवून माफी मागण्याची टँकरचालकाला सक्ती; काणकोणात अमानुष वागणुकीचा धनगर समाजाकडून निषेध

Goa School: बेकायदेशीर शुल्‍क आकारणाऱ्या शाळांना CM सावंत यांची तंबी; 'मुष्टिफंड’ संस्‍थेविरोधात शिक्षण खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT