Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Suchana Seth: पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या CEO सूचनाचा आणखी एक प्रताप; जेलमध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण

Candolim Murder Case: आपल्याच चार वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी सूचना सेठला कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Pramod Yadav

म्हापसा: आपल्याच चार वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सूचना सेठने जेलमध्ये आणखी एक प्रताप केला आहे. सूचनाने महिला कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (०८ एप्रिल) सायंकाळी उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सूचनाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना तिने एस्कॉर्ट सेलच्या महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली. यामध्ये महिला कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकारानंतर महिला कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला कॉन्स्टेबलवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सूचना सेठ कोणत्या कारणावरुन आक्रमक झाली व तिने महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करत मारहाण केली, याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. आपल्याच चार वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी सूचना सेठला कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. पती पत्नीच्या वादातून गेल्यावर्षी जानेवारीत कांदोळीत ही घटना घडली होती. मुलाच्या ताबा कोणाकडे द्यायचा यावरुन पती पत्नीत झालेल्या वादातून ही घटना घडली होती.

सूचना सेठ मुलाचा खून करुन पलायन करण्याच्या प्रयत्नात होती. दरम्यान गोवा पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे गतिमान करत तिला कर्नाटकातून अटक केली होती. सूचनाने मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह बॅगेत भरला होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, सूचनाचा मुक्काम कोलवाळ येथील कारगृहात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

SCROLL FOR NEXT