Sindhudurg: काजू गोळा करायला गेला अन् हत्तीनं पायाखाली चिरडलं; सिंधुदुर्गात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Dodamarg News: हत्तीने लक्ष्मण यांना पायाखाली चिरडल्याने त्यांच्या बरगड्या मोडल्या आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Elephant Mulls Farmer To Death
SindhudurgDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: हत्तीने पायाखाली चिरडल्याने दोडामार्ग, सिंधुदुर्ग येथे ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी काजू गोळा करण्यासाठी गेला असता मंगळवारी (०८ एप्रिल) सकाळी सात वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लक्ष्मण गवस (७०, रा. मोर्ले, दोडामार्ग) असे हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण सकाळी सात वाजता काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेले असता, हत्तीच्या हल्ल्याचे शिकार ठरले. हत्तीने लक्ष्मण यांना पायाखाली चिरडल्याने त्यांच्या बरगड्या मोडल्या आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Elephant Mulls Farmer To Death
Mumbai-Chipi Flights: कोकणातलो चाकरमानी येतलो आता थेट विमानानं...; 10 दिवसांत सुरु होणार मुंबई-चिपी विमानसेवा

घटनेची माहिती मिळताच वन्यविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्तीच्या सुरु असलेल्या उपद्रवाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रानटी गवे, हत्ती, तरस, बिबट्या अशा वन्यजीवांचा परिसरात वावर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Elephant Mulls Farmer To Death
Sindhudurg: बायकोने दारुसाठी 50 रुपये न दिल्याने नवऱ्याने संपवले आयुष्य

जंगली हिंस्र प्राण्यांना थोपविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींना पकडण्यासाठी मोहिम राबविण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com