माती परीक्षण पूर्ण, बोरी पुलाच्या कामाला वेग, केंद्राच्या रस्ते महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Roads and Highways) दिली मंजुरी, Dainik Gomantak
गोवा

गोव्यात तिसऱ्या नवीन पुलाला केंद्राचा हिरवा कंदील

माती परीक्षण पूर्ण, बोरी पुलाच्या कामाला वेग, केंद्राच्या रस्ते महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Roads and Highways) दिली मंजुरी, मडगावच्या (Madgaon) बाजूने वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या चौपदरी महामार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, त्यामुळे हाच मार्ग सध्या बोरीच्या नवीन पुलाला उपयुक्त ठरणार असल्याने याच मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: दक्षिण गोव्यातील (South Goa) दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरलेल्या झुआरी नदीवरील (Zuari River) नवीन बोरी पुलाला अखेर केंद्र सरकारच्या (Central Government) रस्ते महामार्ग वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Roads and Highways) मंजुरी दिल्याने आता या पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या नवीन पुलासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली होती, मात्र अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली नव्हती, ती आता करण्यात आली आहे. राज्यातील आगशी - कुठ्ठाळी झुआरी नदीवरील पुलाला केंद्र सरकारच्या संबंधित खात्याने यापूर्वीच मंजुरी दिल्यामुळे बोरी पुलाचे घोंगडे भिजत पडले होते, मात्र आता पूल बांधकामासह दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याच्या कामाची फाईल हातावेगळी झाली असून त्यासाठी वित्तीय अंदाजत्रकातही तरतूद करण्यात आली आहे.

झुआरी नदीवरील विद्यमान बोरी पूल 1986 पासून कार्यान्वित झाल्याने मडगाव - फोंडा शहरादरम्यानची वाहतूक मोकळी झाली होती. त्यापूर्वी बोरीच्या जुन्या पोर्तुगीजकालीन लोखंडी सांगाड्याच्या पुलावरच वाहतुकीची भिस्त होती. मात्र या पुलावरील वाढती वाहतूक आणि पुलाच्या लोखंडी सांगाड्याची सुरक्षितता पाहता हा जुना पूल अवजड वाहतुकीमुळे धोकादायक ठरल्याने 1980 पासून निर्बंधित वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करून ती अन्य मार्गे वळवण्यात आली होती. याशिवाय बसगाड्यांतील प्रवाशांना उतरवून खाली बसगाड्या सोडण्यात येत होत्या. प्रवासी पुलावरून चालत जाऊन पुन्हा बसगाड्या पकडायचे.

दरम्यानच्या काळात बोरीतील दुसऱ्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर हा पूल 1986 मध्ये वाहतुकीसाठी पूर्ण खुला करण्यात आला. मात्र 1980 च्या दशकातील वाहतूक व त्यानंतरची 20 वर्षांनंतरची वाहतूक पाहता पुलावरील वाढता ताण पुलाची सुरक्षितता ऐरणीवर आली होती. त्यामुळे तिसऱ्या नवीन पुलाला गत्यंतर नव्हती. बोरीतील तिसऱ्या अर्थातच नवीन पुलाच्या बांधकामासाठी 2016 मध्ये प्रत्यक्षात सरकारने कार्यवाही सुरू केल्यानंतर माती परीक्षणाला सुरवात झाली. ठाणे - मुंबई येथील टेक्नोजेन कन्स्ट्रक्शन कंपनीने या माती परीक्षणासह इतर कामाला सुरवात करून आवश्‍यक अहवाल तयार करून तो केंद्र सरकारच्या संबंधित खात्याला पाठवल्यानंतर आता या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे.

झुआरीचे पात्र खोल..

बोरी भागातील झुआरीचे पात्र बरेच खोल आहे. काही ठिकाणी हे पात्र साठ मीटर तर काही ठिकाणी पस्तीस मीटर खोल आहे. दोन महिन्यांपूर्वी बोरीच्या विद्यमान पुलाजवळील जलवाहिनी नेण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला लोखंडी सापळ्याचा पूल अचानक कोसळला होता. या पुलाचा लोखंडी सापळा नदीच्या पात्रात साधारण चाळीस मीटर खाली स्थिरावला आहे. झुआरीच्या पात्रातून यापूर्वी खनिज मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे जलमार्गाला पाण्यात कोसळलेला लोखंडी सापळा बाधा आणणारा नसला तरी तो पाण्यातून बाहेर काढणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे या क्षेत्रातील अभियंत्यांनी सांगितले.

कुठला असेल मार्ग...

बोरीतील तिसऱ्या नवीन पुलासाठी तीन पर्यायी मार्ग केंद्र सरकारच्या संबंधित खात्याला सूचवण्यात आले. या तीनपैकी आता ढवळी फोंड्याच्या बाजूने मुरमे - तामशिरे तर मडगावच्या बाजूने आंगडी - रासई हा मार्ग स्विकारण्यात आला आहे. मडगावच्या बाजूने वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या चौपदरी महामार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, त्यामुळे हाच मार्ग सध्या बोरीच्या नवीन पुलाला उपयुक्त ठरणार असल्याने याच मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ढवळी ते बोरी दरम्यानच्या रस्त्यावर दाट लोकवस्तीसह घरे असल्याने या ठिकाणी चौपदरी रस्ता उभारणे मोठे कौशल्याचे काम होते, ते आता तामशिरे बाजूने मोकळ्या जागेतून नेण्यात येणार आहे. पूल कार्यरत झाला तरी आताचा विद्यमान पूलही सुरूच राहणार असल्याने फोंडा - शिरोड्याहून थेट मडगावला जाणे पूर्वीप्रमाणेच सोयिस्कर ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT