Goa: ‘दाबोळी’ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद झाल्यास पर्यटन व्यवसायाला फटका

नागरी उड्डाण आयुक्त (Civil Aviation Commissioner) कार्यालयाकडे नोंद नसल्याने पेच, डिसेंबर 2021अखेरची मुदत, जे विमानतळ (Airport) नागरी उड्डाण आयुक्तांच्या कार्यालयाशी संलग्न नाहीत, त्या विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय विमाने उतरविण्यात येणार नाहीत.
दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय बंद झाल्यास गोव्याच्या (Goa) पर्यटन व्यवसायाला फटका.
दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय बंद झाल्यास गोव्याच्या (Goa) पर्यटन व्यवसायाला फटका.Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: देशातील विमानतळ नागरी उड्डाण आयुक्त (Civil Aviation Commissioner) कार्यालयाकडे नोंद नसल्यास डिसेंबरनंतर दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद होण्याची शक्यता असून तसे झाल्यास सध्या मंदीत असलेला गोव्याचा (Goa) पर्यटन व्यवसाय (Tourism business) अधिकच कोलमडण्याची शक्यता आहे.

दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय बंद झाल्यास गोव्याच्या (Goa) पर्यटन व्यवसायाला फटका.
गोवा, पुणे, श्रीनगर विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे डिसेंबरनंतर होणार बंद?

जे विमानतळ नागरी उड्डाण आयुक्तांच्या कार्यालयाशी संलग्न नाहीत, त्या विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय विमाने उतरविण्यात येणार नाहीत, असा करार 2018 मध्ये बीजिंग येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. गोव्यासह भारतीय संरक्षण दलाशी निगडित असलेले श्रीनगर आणि पुणे हे तीन विमानतळ सैनिकी तळाशी संलग्न असून हे तिन्ही तळ अजून नागरी उड्डाण आयुक्त कार्यालयाशी संलग्न नाहीत.

बीजिंग येथील बैठकीत जोपर्यंत हे विमानतळ नागरी उड्डाण आयुक्त कार्यालयाशी संलग्न होत नाही आणि या कार्यालयाचा परवाना मिळत नाही, तोपर्यंत या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमानांचे दळणवळण केले जाणार नाही, असे ठरले होते. हा परवाना मिळविण्यासाठी डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, कोविडमुळे ती डिसेंबर 2021 करण्यात आली आहे.

दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय बंद झाल्यास गोव्याच्या (Goa) पर्यटन व्यवसायाला फटका.
दाभोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्रीची बंद

डिसेंबरनंतर दाबोळी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद होणार, अशी कोणतीही सूचना अजून आम्हाला मिळालेली नाही.

- गगन मालिक, संचालक, दाबोळी विमानतळ

असे झाले तर गोव्याच्या पर्यटनाला ते मारक ठरणार आहे. हा मुद्दा आम्ही गोवा सरकारमार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचविला आहे. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल.

- नीलेश शहा, अध्यक्ष, गोवा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com