CCTV Dainik Gomantak
गोवा

Khandepar Bridge: खांडेपार पुलावर अखेर बसवले सीसीटीव्ही कॅमेरे!

Khandepar Bridge: पंचायतीकडून कार्यवाही : कचरा फेकणारे, दारूड्यांवर येणार नियंत्रण, ग्रामस्थांची मागणी पूर्ण

दैनिक गोमन्तक

Khandepar Bridge: खांडेपार पुलावर अखेर कुर्टी-खांडेपार पंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याने येथे कचरा टाकण्याचा प्रकार बंद होईल. तसेच अपघात व दारूड्यांना चाप बसणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कुर्टी ते उसगाव महामार्गावर खांडेपार येथे जुना तसेच नवीन पूल आहे. या ठिकाणी पूर्वी जुना एकेरी पूल कार्यरत होता, त्यामुळे कायम वाहतूक कोंडी होत असे. नंतरच्या काळात चौपदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर खांडेपार येथे नवीन पूल बांधण्यात आला, त्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे मिटली गेली.

पण दोन्ही पुलावरून कचरा फेकण्याचे प्रकार काही बंद झाले नाहीत. याशिवाय अपघात करून पळून जाणारे वाहनचालक तसेच नवीन पुलाच्या जोडरस्त्यावर रात्रीच्यावेळी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारूड्यांमुळे हे पूल नेहमी चर्चेत असतात. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा यावर ग्रामसभेत अनेकदा चर्चा झाली होती.

दारूड्यांवर नजर...

खांडेपारच्या नवीन पुलाचा कुर्टी भागाकडील जोडरस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. हल्लीच या जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण रात्रीच्यावेळी या पुलावर दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. नशेत बाटल्या रस्त्यावर फोडण्याचे प्रकारही होत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अशा प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

दोन्ही पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या पुलावर दारूड्यांकडून धिंगाणा घालणे, कचरा फेकणे व इतर प्रकार होत होते. त्यावर आता नियंत्रण येणार आहे. लोकांची एक मागणी पूर्ण झाल्याने समाधान होत आहे.
- विल्मा परेरा, उपसरपंच, कुर्टी-खांडेपार
गेल्या जुलैमध्ये पंचायतीला दोन्ही पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निवेदन दिले होते. पंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चांगले काम केले आहे.
- संदीप पारकर, आरटीआय कार्यकर्ता खांडेपार
पुलावर सीसीटीव्ही बसवण्याची अत्यंत आवश्‍यकता होती. या पुलावरून कचरा फेकणे, अपघात करून वाहनासह पळ काढणे, शिवाय दारू पिवून धिंगाणा घालणे असे प्रकार वाढले होते. यावर आता आळा बसेल.
- संजना नाईक, सरपंच, कुर्टी-खांडेपार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT