Margao: पायाक्षेत्र शुल्क वाढविण्यास विरोध

Margao: शॅडो कौन्सिलकडून मडगाव नगरपालिकेचा निषेध
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Margao: मडगाव पालिका मंडळ घोटाळे, गैरकारभार व बेकायदा कामाचे तसेच भ्रष्टाचाराचे आगर बनल्याचा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम पायाक्षेत्र शुल्क वाढीस पालिकेने मान्यता देणे अन्यायकारक असून याचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.

Margao Municipality
Goa Sonsodo Project: सोनसडोकडे आता तरी गांभीर्याने पाहा...

बांधकाम शुल्कात ३८ ते ४८ टक्के वाढ केल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बांधकाम परवाना शुल्कात वाढ झालेलीच आहे, शिवाय लिफ्ट असेल तर प्रत्येक लिफ्टामागे 82,500 रुपये व इतर प्रत्येक नमुद केलेल्या कामाप्रमाणे आणखी शुल्क भरावे लागणार आहेत. हा अन्याय असून पालिकेने सारासार विचार करून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.

सरकारने शुल्कात केलेल्या वाढीस मान्यता देणे पालिकेवर बंधनकारक नाही असे नगरसेवक घनश्याम शिरोडकर सांगत असताना देखील नगराध्यक्ष नगरसेवकांवर दबाव आणीत होते असे चित्र पालिका मंडळाच्या बैठकीत दिसून आले. त्यामागे आमदार दिगंबर कामत यांचाही हात असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. या बैठकी पूर्वी 2 नोव्हेंबर रोजी आमदाराने त्याच्या पक्षातील सर्व नगरसेवकांना घरी बोलावून शुल्क वाढीस मान्यता द्यावीच लागेल असा त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, असेही कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

आमदार कामत यांनी विधानसभेत याच शुल्क वाढीला विरोध केला होता. तसेच या शुल्क वाढीत सुसूत्रीकरण आणण्याची सूचना केली होती. 25 ऑगस्टच्या पालिका मंडळाच्या बैठकीत हा विषय पुढे ढकल्याणतही आला होता. आता तीन महिन्यांनी आमदारांना कसली उपरती आली, असा प्रश्र्न कुतिन्हो यांनी उपस्थित केला.

जीसुडातर्फे पालिका इमारतीचे नूतनीकरण केले जाणार असून देखील छपराची वेगळी दुरुस्ती हे तर्कात बसत नाही. 14 व्या वीत्त आयोगाचा निधी संपविण्यासाठी त्यांना मोठ मोठे प्रकल्प पाहिजेत, असा आरोपही कुतिन्हो यांनी केला. या पत्रकार परिषदेस आर्किटेक्ट चार्लस ग्रासियस, आनेल आल्वारिस, अझीझ शाह, लालन व सुदाता पार्सेकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com