Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: सीबीआयने डुडू याला बजावली नोटीस; 25 रोजी सुनावणी

पुढील सुनावणीवर्यंत सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चितीच्या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Drugs Case: ड्रग्ज तस्करीप्रकऱणी इस्रायली डेव्हिड डिहॅम ऊर्फ डुडू याला न्यायालयाने निर्दोष मुक्त ठरवून ही कारवाई करणाऱ्या सात पोलिसांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता. या आदेशाला पाच पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सीबीआय तसेच डुडू याला नोटीस बजावून त्यावरील सुनावणी येत्या 25 सप्टेंबरला ठेवली आहे.

पुढील सुनावणीवर्यंत सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चितीच्या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी २०१० साली हणजूण येथील सेंट अँथनी चॅपेलजवळ छापा टाकून डुडू याला ड्रग्जसह अटक केली होती. गोवा पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. मात्र, या प्रकरणात राजकारणी व पोलिस गुंतले असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी एका काँग्रेस नेत्याने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी सीबीआयने पुढील तपास केला होता.

सीबीआयने छाप्यात सहभागी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल, पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह इर्मिया गुरैया, समीर वारखंडकर, महादेव नाईक, नागेश पार्सेकर, महाबळेश्वर सावंत या सात पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात षडयंत्र रचणे, बनावट गुन्हे दाखल करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे या आरोपांसह पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने पुरवणी आरोपपत्रावरील सुनावणीवेळी या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिला होता. त्याला पाच पोलिसांनी आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

SCROLL FOR NEXT