Cashew
Cashew Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत काजू कलम केवळ 15 रुपयांत

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी हा कृषिप्रधान तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात बागायतदार जमिनीत नवीन काजू कलमांची लागवड करत असतात. बागायतदारांना चांगली दर्जेदार स्वरूपाची कलमे कमी दरात मिळावी यासाठी आता सत्तरी तालुक्यातील काजू बागायतदारांना केवळ 15 रुपयांनी वेंगुर्ला 4 व वेंगुर्ला 7 या जातीची कलमे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (Cashew crop for Rs 15 in Sattari Goa)

सुरुवातीला 40 हजार कलमे उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या संचालक मंडळाने आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग गावस, संचालक प्रदीप गवंडळकर, शहाजी देसाई, नारायण गावकर, सीताराम देसाई, ॲड. गणपत गावकर, सुरंगा नाईक, कार्यकारी संचालक सुरेश गावकर उपस्थित होते.

पांडुरंग गावस म्हणाले, सोसायटीने नर्सरीचा परवाना मिळवला आहे. त्यासाठी अडवई गावातील शांताबाई देसाई यांनी नर्सरीसाठी जागा दिली आहे. केंद्र सरकारच्या काजू आणि कोको विकास संचालनालय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, केरा भवन कोचीतर्फे ही योजना राबवण्यात येत आहे.

आजच्या घडीला प्रती काजू कलमांची किंमत 70 ते 80 रुपयांपर्यंत असते. सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीने बागायतदारांचा विचार करून ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सोसायटीच्या वाळपई, ठाणे, अडवई, केरी आदी शाखेत अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत कृषी कार्ड जोडणे, एक छायाचित्र व बँकेची माहिती असणे आवश्‍यक आहे. तसेच योजनेव्यतिरिक्त अन्य पिके जशी फणस, नारळ, सुपारी, आंबा यांचीही रोपे बाजारभावपेक्षा कमी दरात उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती गावस यांनी दिली.

काजू योजनेसाठी एकरी किमान 80 काजू कलमे खरेदी करणे आवश्यक असणार आहे. हेक्टरी दोनशे घ्यावी लागणार आहेत. पहिल्या वर्षी लागवडीसाठी 12 हजार, दुसऱ्या वर्षी 4, तिसऱ्या वर्षी 4 हजार असे एकूण तीन वर्षे 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. केवळ पंधरा रुपयांनी काजू कलमे खरेदी करून बागायतदारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

- पांडुरंग गावस, शेतकरी सोसायटी अध्यक्ष, सत्तरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

Bicholim News : खाण क्षेत्रातून गाव वगळा जनतेची मागणी ; मंदिरे, घरे, जलस्रोत धोक्‍यात

Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

SCROLL FOR NEXT