Case Dainik Gomantak
गोवा

Merces: 87 हजार रोख, कंपनीची स्कुटर घेऊन फरार; 9 वर्षे चालला खटला; आंध्र प्रदेशच्या रहिवाश्याची निर्दोष मुक्तता

Goa Court: मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्‍या न्यायमूर्ती सारिका फळदेसाई यांनी हा निकाल दिला. २०१६ मध्ये दाखल झालेल्‍या तक्रारीनंतर संशयितावर आयपीसी कलम ४०८ अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.

Sameer Panditrao

पणजी: तब्बल नऊ वर्षांच्या कायदेशीर खटाटोपानंतर आंध्र प्रदेशचा रहिवासी हरीश कुमार याला न्‍यायालयाने निर्दोष मुक्त केले. “तो खरंच तक्रारदाराचा कर्मचारी होता हेच सिद्ध झालेले नाही” असे निरीक्षण न्‍यायालयाने नोंदविले.

मेरशी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्‍या न्यायमूर्ती सारिका फळदेसाई यांनी हा निकाल दिला. २०१६ मध्ये दाखल झालेल्‍या तक्रारीनंतर संशयितावर आयपीसी कलम ४०८ अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.

संजीव तारकर हे तक्रारदार आहेत. त्‍यांनी आरोप केला होता की, पणजी युनियन बँक ऑफ इंडियाच्‍या शाखेतून रोकड काढण्यासाठी हरीश कुमारला चार धनादेश दिले होते. परंतु ८७ हजारांची रोकड आणि कंपनीचा स्कूटर घेऊन फरार झाला.परंतु सुनावणीदरम्यान एकही ठोस पुरावा मिळाला नाही.

पार्श्वभूमी अशी

फेब्रुवारी २०१६ : तक्रार दाखल

मार्च २०१७ : हरीश कुमारला अटक

एप्रिल २०१७ : जामिनावर सुटका

जुलै २०१९ : आरोपपत्र सादर

सप्टेंबर २०२५ : निर्दोष सुटका

धनादेश प्रकरणीही ढिलाई

तक्रारदाराकडून संशयिताला धनादेश देण्यात आले, याचा कुठलाही ठोस पुरावा नोंदवला गेला नाही. धनादेश कुठे दिले होते याची स्पष्ट आठवण तक्रारदारालाच नव्हती. तसेच त्यावेळी उपस्थित असल्याचा दावा केलेल्या पत्नीला साक्षीसही बोलावले गेले नाही. व्यवहाराशी संबंधित बँक अधिकाऱ्यांनीही साक्ष दिली नाही. शिवाय सादर केलेल्या धनादेशांवरील सही संशयिताची आहे, हे सिद्ध करण्यातही अपयश आले, असे न्‍यायालयाने म्‍हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT