Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

High Court Of Bombay At Goa: संशयित आरोपी इगनाटीयस मींज याला २०१८ मध्ये मजुराच्या खून प्रकरणात १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
High Court Of Bombay At Goa | Crime News Verdict
High Court Of Bombay At GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खून प्रकरणाच्या सुनावणीत प्रधान जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बदलला आहे. जिल्हा न्यायालयाने २०१८ च्या खून प्रकरणात आरोपीला दहा वर्षाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने हा निर्णय बदलून आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा न्यायालयाचा निर्णय केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबानीवर आधारीत होता, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोंदवले आहे.  हायकोर्टाने कोलवाळ येथील तुरुंग प्रमुखांना आरोपीची कायदेशीर कारवाई पूर्ण करुन सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

संशयित आरोपी इगनाटीयस मींज याला २०१८ मध्ये मजुराच्या खून प्रकरणात १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

High Court Of Bombay At Goa | Crime News Verdict
Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

वार्का येथे २०१८ रोजी थाडीयस बारा (रा. झारखंड) याचा अज्ञातांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी कंत्राटदाराने कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी संशयित इगनाटीयस मींज याला अटक केली होती. पोलिसांनी संशयिताला प्रधान जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा वर्ष कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

जिल्हा न्यायालयाने दिलेले निर्णय केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबानींवर आधारीत असून, तो विश्वासार्ह धरला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने संशयित मींज यांची सुटका करण्याचे आदेश कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com