Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

Actor Imran Khan Leave India Notice: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. मुंबई पोलिसांनी इम्रानला देश सोडण्याची नोटीस पाठवली.
Actor Imran Khan Leave India Notice
Imran KhanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Actor Imran Khan Leave India Notice: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. मुंबई पोलिसांनी इम्रानला देश सोडण्याची नोटीस पाठवली. 28 ऑक्टोबरपर्यंत त्याला भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले. इमिग्रेशन कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. भारताचा नागरिक नसतानाही त्याने मुंबईतील सीजेपीच्या जाहीर आंदोलनात सहभाग घेतला. या नियमांच्या उल्लंघनामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर हा कायदेशीर बडगा उगारला.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी इम्रान आंदोलनात सहभागी झाला होता. या आंदोलनात इम्रान आपली गर्लफ्रेंड लेखा वॉशिंगटन आणि बहीण जॅन मॅरी खान यांच्यासोबत सहभागी झाला होता. आंदोलनादरम्यान त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्पुरते ताब्यातही घेतले, मात्र नंतर सोडून देण्यात आले होते.

Actor Imran Khan Leave India Notice
Mumbai Railway Police Twitter Account Hack: मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक, नव्या ट्विटवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली, तेव्हा असे समोर आले की, इम्रान हा भारतीय नागरिक नाही. तरीही तो अशा राजकीय आंदोलनात सहभाग झाला, जो परदेशी नागरिकांसाठी नियमांच्या विरोधात आहे. यानंतर भाजपचे (BJP) खासदार किरीट सोमैया यांनी मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र लिहून इम्रानवर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. या सर्व घडामोडींनंतर, इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करत पोलिसांनी त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची नोटीस बजावली. या बातमीमुळे सिनेविश्वात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com