IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Goa IDC Exit Support Scheme Extension 2026: बंद आणि निष्क्रिय औद्योगिक युनिट्‌स (घटक) पुन्हा सुरू करण्यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) ‘एक्झिट सपोर्ट योजने’ला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
Goa IDC Exit Support Scheme Extension 2026
IDC Exit Support SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: बंद आणि निष्क्रिय औद्योगिक युनिट्‌स (घटक) पुन्हा सुरू करण्यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) ‘एक्झिट सपोर्ट योजने’ला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ ९ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली आहे. योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ५६ औद्योगिक घटकांचे हस्तांतरण झाले असून, त्यातून १६५.२९ कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक आणि १,९६९ रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

२५ जून २०२४ रोजी सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश वापराविना पडून असलेले औद्योगिक भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देणे हा आहे. पात्र घटकांच्या हस्तांतरणासाठी भूखंडावर ३० टक्के बांधकाम पूर्ण असण्याची पूर्वअट शिथिल करण्यात आली आहे. मात्र, हस्तांतरणानंतर दोन वर्षांत निर्धारित बांधकामाची अट पूर्ण करावी लागेल. पहिल्या वर्षाचे भाडेही माफ केले जाते.

Goa IDC Exit Support Scheme Extension 2026
Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

महामंडळाने ओळखलेल्या ४३६ निष्क्रिय घटकांपैकी ९९ घटक पुन्हा सुरू झाले आहेत, तर १८ घटकांनी सहा ते आठ महिन्यांत कामकाज सुरू करण्याची हमी दिली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आठ घटकांना बेदखलीचे आदेश देण्यात आले असून, २५५ प्रकरणे सुनावणीच्या प्रक्रियेत आहेत.

औद्योगिक जमिनीचा उत्पादक वापर, नव्या गुंतवणुकीला चालना आणि रोजगारनिर्मिती ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि गोवा-आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी सांगितले.

Goa IDC Exit Support Scheme Extension 2026
Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com