Cash For Job Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: हळदी-कुंकूला आल्‍या अन् लावला चुना; नौदलात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा

Margao Cash For Job Scam: विषया गावडे आणि सोनिया आचारी यांना काल १६.२७ लाख रुपयांच्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घाेटाळ्‍यात मडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Cash For Job Scam

मडगाव: कुणाच्‍या तरी ओळखीने विषया गावडे आणि सोनिया आचारी या दोघींही नागमोडे-मडगाव येथे राहणाऱ्या सुनील बाेरकर यांच्‍या भावाच्‍या घरी असलेल्‍या हळदी-कुंकू सोहळ्याला उपस्‍थित राहिल्‍या. त्‍यातूनच त्‍यांची ओळख आणखी दृढ झाली. तुझ्‍या भावाला नौदलात नोकरी मिळवून देताे, असे सांगून त्‍याच्‍याकडून १६ लाख रुपये घेतले. पण शेवटपर्यंत नाेकरी दिलीच नाही. मात्र,‘हळदी-कुंकू’च्‍या निमित्त या दोघींशी झालेली दोस्ती बोरकर यांना तब्‍बल १६ लाखांचा चुना लावणारी ठरली.

विषया गावडे आणि सोनिया आचारी यांना काल १६.२७ लाख रुपयांच्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घाेटाळ्‍यात मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सध्‍या विषया ही नेसाय येथे आणि सोनिया कारवार येथे रहात असली तरी पूर्वी त्‍या दोघीही कालकाेंडा-मडगाव येथे रहात होत्‍या. तक्रारदार बाेरकर ज्‍या वाड्यावर रहात हाेता, ताे नागमोडे वाडा हा कालकोंडे वाड्याला जवळचा. त्‍यामुळेच या दोन्‍ही महिलांशी बोरकर कुटुंबीयांची ओळख वाढली होती.

जानेवारी २०२० च्‍या सुमारास या दोघींनी अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्‍या संदीप बोरकर या सुनील बोरकर यांच्‍या भावाला नौदलात नोकरी मिळवून देण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला. त्‍यानंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून बोरकर यांनी त्‍यांच्‍याकडे १६.१२ लाख रुपये पाेचते केले. मात्र, शेवटपर्यंत त्‍याच्‍या भावाला ही नोकरी मिळालीच नाही.

२०२० च्‍या सुमारासच याच दोन्‍ही ठकसेन महिलांनी राजेशनगर फातोर्डा येथे रहाणाऱ्या साईश कोमरपंत यालाही त्‍याच्‍या मुलाला नाैदलात लेफ्‍टनंट कमांडर या हुद्याची नाेकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने २७.७२ लाख रुपये घेतले होते. मडगाव येथे रहाणारा राजेश मुकुंद नाईक या युवकाने कोमरपंत याची गाठ या दोन महिलांशी घालून दिली होती.

कोमरपंत याने ही रक्‍कम विजया गावडे आणि अक्षता गावडे या दोन महिलांकडे सुपूर्द केली हाेती आणि विजयाने ही रक्‍कम सोनियाकडे दिली होती असे मायणा-कुडतरी पोलिसात दाखल केलेल्‍या प्रकरणात स्‍पष्‍ट झाले होते. २७ एप्रिल २०२३ रोजी या संशयितांविराेधात मायणा-कुडतरी पाेलिसांनी गुन्‍हा नोंदवला होता. मात्र, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्‍याने त्‍या बचावल्‍या होत्‍या.

कोण ही पौर्णिमा कोळंबकर?

कोमरपंत प्रकरणात मायणा-कुडतरी पाेलिसांनी सोनिया आचार्य हिची चौकशी केली असता आपण ही रक्‍कम खुरसावाडा-कारवार येथे राहणाऱ्या पौर्णिमा सतीश कोळंबकर या महिलेच्‍या स्‍वाधीन केली होती, अशी कबुली तिने दिली होती. या कबुलीनुसार मायणा-कुडतरी पोलिसांनी कारवार येथे जाऊनही चौकशी केली हाेती. पण त्‍यावेळी त्‍याच्‍या हाताला फारसे काही लागले नव्‍हते. या महिलेची या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती, हे अजून पोलिसांना स्‍पष्‍ट करता आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT