Carnival in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात कार्निव्हलनिमित्त विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल

मडगावामधील जिल्हा न्यायालय ते बोरकर सुपर मार्केटपर्यंत कार्निव्हल चित्ररथांचे संचलन

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव नगरपालिकेने यंदा कार्निव्हल निमित्त 25 आणि 26 फेब्रुवारी असे दोन दिवस विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडीस यांनी कार्निव्हलच्या आयोजनाबाबत माहिती दिली. मडगावातील कार्निव्हल हा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी नटलेला असेल असंही त्यांनी सांगितलं. (Carnival in Madgaon News Updates)

मडगावमध्ये (Madgaon) कार्निव्हलवेळी शुक्रवारी 25 रोजी अॅड. जॉन फर्नांडिस आणि साथीदारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात नाट्य, पारंपरिक नृत्य तसेच घुमट आणि कासाळे वादनाचा समावेश असेल. तर शनिवारी 26 रोजी सां जुझे आरियल येथील दुमिंग मास्कारेन्हस आणि साथीदार जागोर सादर करतील.

दुमिंग हा आघाडीचा प्रसिद्ध आणि ज्येष्ठ पारंपरिक नृत्य कलाकार असून जागोरद्वारे तो गोव्यातील (Goa) कॅथलिक समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करत आहे. दोन्ही दिवस कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरु होऊन रात्री दहापर्यंत संपतील. वरील दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्त रविवार 27 रोजी जिल्हा न्यायालय ते बोरकर सुपर मार्केटपर्यंत कार्निव्हल (Carnival) चित्ररथांचे संचलन होईल. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार आपल्या गायन, वादन कौशल्याचे प्रदर्शनही करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT