मडगाव : हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीय कुडो आणि दुसऱ्या फेडरेशन कप कुडो स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत 9 सुवर्ण, आणि प्रत्येकी 5 रौप्य तसेच 19 कांस्य पदकं जिंकली, तर फेडरेशन कप स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य व 8 कांस्य पदकांसह 19 पदकांसह एकूण 38 पदके जिंकली. (National Kudo Championship News Updates)
या गोमंतकीय (Goa) संघासोबत प्रमुख प्रशिक्षक आणि गोवा कुडो संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद जुवेकर, सचिव शशी सहानी आणि अधिकारी महेश्वर गडेकर हिमाचलमधील स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत 32 राज्यांतील 1900 खेळाडूंना भाग घेतला होता.
राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांपैकी निशी जुवेकर, अनन्या कोरटी, सोनाली मठकर, धानवी कुबल, रक्षा मठकर, जोनाथन द आल्मेदा, गुनमे कादोळकर, मित्रन च्यारी यांनी सुवर्णपदकाची (Gold Medal) कमाई केली तर प्रणिता ओटवणेकर, सुकांती गडेकर, सानिका सातर्डेकर, आयन कोरटी, संपूर्ण सातर्डेकर यांनी रौप्य पदक पटकावलं. सोबतच संचित परब, पराग काकोडकर, साईवन फेर्रांव, आयन अत्तर, सिया फडते यांनी कांस्यपदक जिंकलं आहे.
द्वितीय फेडरेशन कप स्पर्धेत निशी जुवेकर, अनन्या कोरटी, संपुर्ण सातर्डेकर, सोनाली मठकर, रक्षा मठकर, जोनाथन द आल्मेदा, गुनमे काडोळकर, मित्रन च्यारी यांना सुवर्णपदक, सिया फडते, प्रांजल पाटील, सानिका सातर्डेकर यांना रौप्य (Silver Medal) आणि पराग काकोडकर, आयन अत्तर, नेहारीका जुवेकर, नवीन तिवारखेड, प्रणिता ओटवणेकर, धानवी कुबल, आयन कोरटी, दुध गावकर यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. या पदक विजेत्यांव्यतिरिक्त प्रज्वल पाटील, जुवेल द आल्मेदा, रेश्मा फडते, भिकाजी मोटे, रुपरम चौधरी, क्षितीज परब हे स्पर्धकही स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.