fire ACGL store Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाजवळ मालवाहू रिक्षा भस्‍मसात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाजवळ एका चालत्या मालवाहू रिक्षेला आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली.

दैनिक गोमन्तक

Dabolim Airport:

दाबोळी विमानतळाजवळ एका चालत्या मालवाहू रिक्षेला आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत रिक्षा जळून खाक झाली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी 5 वाजता घडली.

सदर मालवाहू रिक्षा दाबोळीहून मांगूरहिलच्या दिशेने जात असता विमानतळाजवळ रिक्षाला अचानक आग लागली. चालकाला याची चाहूल लागताच त्याने प्रसंगवधान राखून आपला जीव वाचवला.

रिक्षाला लागलेली आग वाढतच गेली. यावेळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी वरून पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्‍याचे प्रयत्‍न केले.

दरम्‍यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अखेर दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळाली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्‍याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT