Goa Road Close: रायबंदर ते जुने गोवे रस्ता 10 मार्चपासून 31 एप्रिलपर्यंत बंद

Goa Road Close: रायबंदर येथे स्मार्ट सिटीची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ‘आयपीएससीडीएल’ने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी रायबंदर येथील रस्ता बंद करण्याबाबत चर्चा केली.
Goa Road close
Goa Road closeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Road Close:

रायबंदर येथे स्मार्ट सिटीची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ‘आयपीएससीडीएल’ने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी रायबंदर येथील रस्ता बंद करण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत  10 मार्च ते 31 एप्रिलपर्यंत हा  रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कालावधीत वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला. प्रस्तावित प्रकल्पाचा अंतिम भाग 6 मार्चपासून चार टप्प्यांत सुरू होणार आहे.

यामध्ये मलनिस्सारण आणि गॅस वाहिनी टाकणे, यासारख्या कामांचा समावेश आहे. आयपीएससीडीएल चे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलिस निरीक्षक चेतन कवळेकर, महापालिका अभियंता थॉमस ब्रागांझा, पोलिस उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा, विठ्ठल चोपडेकर, (रायबंदर नगरसेवक - प्रभाग २८),

Goa Road close
Lok Sabha Election: उपोषणकर्त्यांनी भाऊंना सुनावले खडे बोल

सिल्वेस्टर फर्नांडिस (रायबंदर नगरसेवक - प्रभाग २९), सांद्रा दा कुन्हा (रायबंदर नगरसेवक - प्रभाग ३०), संदेश चोपडेकर (पंचसदस्य चिंबल) यांच्यासह इतर प्रमुख भागधारक उपस्थित होते.

बन्सल इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि.चे गोपाल कृष्णा यांनी वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.

ट्रॅफिक सेल आणि नगरसेवकांना प्रकल्पाच्या तपशिलाची माहिती देणे, शालेय परीक्षांच्या समस्यांचे निराकरण करणे, दिवजा सर्कल ते अजुदा चर्च जंक्शन आणि पुन्हा परत ही अतिरिक्त बस वाहतूक सेवांचे नियोजन करणे, शालेय बसेसचे तपशील सल्लामसलत करून तयार केले जातील, असे या बैठकीत ठरविले.

Goa Road close
Illegal Construction: आदेशात सुधारणेसाठी खंडपीठाकडून नकार

बासिलिका ऑफ बॉम जीझस (ओल्ड गोवा) जंक्शन ते दिवजा सर्कलपर्यंतचा संपूर्ण रस्ता १० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत जुने गोवेकडून पणजीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बंद राहील. ही वाहतूक राष्ट्रीय महामार्ग-७४८ वरून (कदंब बायपास रोड) वळविली जाईल. ‘आयपीएससीडीएल’ने स्मार्ट रायबंदर प्रकल्पाच्या योजनांचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले आहे.

जादा बसेस पुरवणार

शाळकरी मुले तसेच प्रवाशांना आजुदा चर्च ते दिवजा सर्कल येथे ये-जा करण्यासाठी आणखी बसेस पुरवण्याचे ठरवले असल्याचे संजीत रॉड्रिग्स यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. नेमक्या किती कदंब बसेस या मार्गावर धावणार, हे आताच सांगता येणार नाही; पण या मार्गावर सतत बससेवा सुरू असेल, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले. आम्ही बस वेळापत्रकाबद्दल नगरसेवक, शाळा आणि बसचालकांशी चर्चा करू, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com