Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : करंझाळे किनारी वॉटर स्‍पोर्टस्‌ नकोच : स्‍थानिक आक्रमक

Panaji News : मासेमारीवर होऊ शकतो परिणाम; प्रसंगी रस्‍त्‍यावर उतरू

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सरकार करंझाळे किनारपट्टीवर वॉटर स्‍पोर्टस्‌ आणायच्या बेतात आहे. हा बेत आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कारण बोटींच्या आवाजाने किनाऱ्याजवळ मासळी येणार नाही.

परिणामी आमच्‍यावर उपासमारीची वेळ येईल. म्‍हणूनच याविरोधात प्रसंगी आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरू, असा इशारा करंझाळे रापणकार संघटना आणि पारंपरिक मासेमारी संघटनेने दिला.

संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस वाझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मत्स्यविभाग तसेच पर्यटन विभागाकडून करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ आणण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत. त्‍यामुळे मासेमारीवर वाईट परिणाम होणार आहे. यावेळी संघटनेचे सचिव मान्‍यूएल पो, अँथनी वाझ आणि सुमारे ४० मच्‍छीमार बांधव उपस्‍थित होते.

मान्‍यूएल पो, यांनी सांगितले की गेली अनेक शतके करंझाळे येथील स्थानिक मच्‍छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. या अगोदर असाच बेत अनेकदा करण्‍यात आला.

पण आम्ही तो हाणून पाडला. आता पर्यटन आणि मत्स्यविभाग येथे वॉटर स्‍पोर्टस्‌ आणायला बघत आहे. यामुळे आमच्या दैनंदिन व्यवसायावर वाईट परिणाम होईल. असे झाल्यास आम्ही कसे जगावे?

स्‍थानिकांना विश्‍‍वासात घेतले जात नाही

आम्ही पारंपरिक मासेमारी करतो आणि त्यामुळे किनारपट्टी प्रदूषणविरहित तसेच शांत असणे आवश्यक आहे. पर्यटन व मत्स्यविभागाचे अधिकारी अचानक येऊन करंझाळे किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ क्रियाकलाप आणण्यासाठी सीमांकन करायला येतात.

विशेष आम्‍हाला याबाबत विश्‍‍वासातही घेतले जात नाही. याबाबत आम्ही ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट' या मुख्य संघटनेशी चर्चा करणार आहोत, असे अँथनी वाझ यांनी सांगितले

करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर आम्‍ही कुठल्याही परिस्थितीत वॉटर स्पोर्टस्‌ येऊ देणार नाही. कारण त्‍यामुळे आमच्‍या पारंपरिक मासेमारीवर परिणाम होईल. म्‍हणूनच गरज पडल्‍यास आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरून प्राणपणाने लढू.

- फ्रान्सिस वाझ, अध्‍यक्ष, (करंझाळे रापणकार संघटना)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT