Oceanman swimming controversy Goa Dainik Gomantak
गोवा

Oceanman Controversy: मच्छीमारांनी काय करावे? 'ओशनमॅन'वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; प्रशासन पूर्णपणे खालावल्याचे आरोप

Oceanman controversy Goa: करंजाळे किनाऱ्यावर रविवारी परवानगीशिवाय घेण्यात आलेल्या ‘ओशनमॅन’ जलतरण स्पर्धेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: करंजाळे किनाऱ्यावर रविवारी परवानगीशिवाय घेण्यात आलेल्या ‘ओशनमॅन’ जलतरण स्पर्धेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर तीव्र टीका होत आहे. प्रशासन पूर्णपणे खालावले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा आणि ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी संताप व्यक्त करत, सरकार समुद्र पर्यटनासाठी क्षेत्र खुले करत असताना स्थानिक मच्छीमारांच्या हक्कांवर गदा आणत आहे. फेरेरा म्हणाले, स्थानिक मच्छीमार हे पारंपरिक व्यवसायावर जगतात. सरकारच अशा बेकायदेशीर क्रीडा उपक्रमांना परवानगी देत असेल तर मच्छीमारांनी काय करावे?

समुद्रकिनारा ‘क्रीडा पर्यटन’ म्हणून घोषित करण्यापूर्वी स्थानिकांचा विचार झाला पाहिजे. दरम्‍यान, या प्रकरणी ‘ओशनमॅन गोवा’ या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजक कपिल अरोरा यांना पणजी पोलिसांनी अटक केली असून, सत्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोललि कोठडी सुनावली आहे.

करंजाळे समुद्रावर झालेल्या या स्पर्धेला तीव्र विरोध झाला असून यापुढेही विरोध सुरूच राहील. आम्ही मत्स्यव्यवसाय विभागाला निवेदन देणार आहोत. आयोजकांविरोधात कठोर कारवाई करावी. स्थानिक मच्छीमारांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
वीरेश बोरकर, आमदार (आरजी)
गोव्यातील ‘सीआयडी’ आणि ‘क्राईम ब्रँच’ नेमके काय करतात? अशा बेकायदेशीर उपक्रमाची त्यांना माहिती नव्हती का? करंजाळे समुद्रकिनारा क्रीडा पर्यटनासाठी अधिसूचित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण स्थानिकांचा मुळीच केला विचार नाहीय.
कार्लुस फेरेरा, आमदार (काँग्रेस)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT