car hit them both in goa Dainik Gomantak
गोवा

बेतोड्यात कारने दिली दोघांना धडक

अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने भरधाव कारगाडी बाजूला वळवली

दैनिक गोमन्तक

फोंडा: बेतोडा येथे मुख्य रस्त्यावर काल झालेल्या कारगाडीच्या अपघातात (Accident) दोन पादचारी जखमी झाले. हा अपघात संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडला. बेतोड्याहून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या जीए05 डी 9208 या क्रमांकाच्या कारगाडीने समोरून येणाऱ्या प्रभा टोपो (वय 25) व मनोज इक्का (वय 28) या दोघांना जोरदार ठोकर दिली.

त्यात प्रभा टोपो ही महिला गंभीर जखमी झाली. अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने भरधाव कारगाडी बाजूला वळवली असता समोरून येणाऱ्या दोन्ही पादचाऱ्यांना ठोकरल्याचे समजते. दोन्ही पादचाऱ्यांना ठोकरल्यानंतर कारगाडीने रस्त्यावरील कुंपणाला धडक दिली. कामगार असलेले मनोज व प्रभा हे दांपत्य मूळ झारखंड येथील असून त्यांचे बेतोडा येथे वास्तव्य होते. जखमी महिलेला बांबोळी इस्पितळात (MGCH) उपचारासाठी दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT