Boat Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Boats Seized : कॅप्टन ऑफ पोटर्स अ‍ॅक्शन मोडवर; सिकेरी, कांदोळीत बेकायदा 5 बोटी जप्त

क्षमता मर्यादेचे उल्लंघन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa boating : गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. त्यानुसार राज्यात अनेक पर्यटक भेट देताहेत. याचा गैरफायदा घेत काही बेजबाबदार ऑपरेटर्स पर्यटक प्रवाशांना बेकायदेशीरपणे सामावून घेताहेत.

यातील बरेच ऑपरेटर हे योग्य परवाने व प्रशिक्षणाशिवाय काम करतात. त्यामुळेच कॅप्टन ऑफ पोटर्सने या बेकायदेशीरतेच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि अशा क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी आज सिकेरी-कांदोळी येथे कॅप्टन ऑफ पोटर्सने तपासणी केली.

आवश्यक परवाने नसताना व ओव्हरलोड करून पर्यटकांची प्रवासी भाडी मारणाऱ्या पाच बोट शुक्रवारी सिकेरी-कांदोळी येथे कॅप्टन ऑफ पोटर्सने कारवाई करीत जप्त केल्या आहेत. मरीन निरीक्षकांकडून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, या प्रवासी बोट चालकांकडे आवश्यक परवाने नव्हते. संबंधित चालक हे वैध परवान्याशिवाय बोट चालवण्यासोबत परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत होते.

याविषयी कॅप्टन ऑफ पोटर्सकडे तक्रारी येत असल्याने शुक्रवारी सिकेरी-कांदोळी येथे अचानक छापा टाकत वरील प्राधिकरणाने ही कारवाई केली. दरम्यान, अनेकदा अशा ओव्हरलोड प्रकारमुळेच समुद्रात बोट उलटण्याच्या काही घटना घडलेल्या आहेत.

मात्र जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण व मोठया दुर्घटना टळल्या आहेत. त्यामुळे काही बेजबाबदार ऑपरेटर जे धोकादायक पद्धतीने पर्यटकांच्या जीवाशी खेळतात त्यांच्यावर अशीच कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

या जप्त केलेल्या बोटी एकाच मालकाच्या असून हा मालक परदेशात असतो, असे सूत्रांकडून समजते. संबंधित चालकांकडे प्रवासी बोट चालविण्याचा परवाना नव्हता. ज्या कामगारांना बोट चालविता येते किंवा स्विमिंग येते, अशी मंडळी या बोटी चालवायचे. त्यानुसार, कॅप्टन ऑफ पोटर्सने कारवाई करीत त्या जप्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT