चिंबल येथील सरकारी जमीन हडप करून विक्री केल्या- प्रकरणी गुन्हा शाखेने २०१९ मध्ये सांताक्रुझचे विद्यमान आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. (Land Grabbing Case)
हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. रुडोल्फो फर्नांडिस यांच्या विरोधात तिसवाडीच्या मामलतदाराने दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे फसवणूक केल्याबद्दल FIR दाखल केला होता.
चिंबल येथील २६,०२५ चौरसमीटर सरकारी जमीन रुडॉल्फ, गुणवंती मोंतेरो आणि इतरांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने १९९६ सालापासून खासगी व्यक्तींच्या नावे हस्तांतरित केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती.
नंतर गुन्हा शाखेने एसआयटी स्थापन केली होती. हा गुन्हाच खंडपीठाने रद्द केला आहे.
दरम्यान गोव्यात जमीन हडप केल्याची नवनवीन प्रकरणे समोर येत असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने नियुक्त केलेल्या एकसदस्यीय आयोगाचे काम सुरु झाले आहे.
निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्या कडून बार्देश तालुक्यातील आसगाव पंचायत क्षेत्र, हणजूण, कळंगुट येथील प्रकरणांची पाहणी करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.