Chaddar Treak : गोव्याच्या 'गुंजन'ची आणखी एका विक्रमाला गवसणी; विक्रमी वेळात अवघड 'चादर ट्रेक' पूर्ण

काही दिवसांपूर्वी गुंजनने सर केला होता एव्हरेस्टचा बेस कॅम्प
Gunjan Narvekar
Gunjan NarvekarDainik Gomantak

Chaddar Treak : गोव्याची किशोरवयीन गिर्यारोहक गुंजन नार्वेकर हिने लडाखमधील गोठलेल्या जंस्कार नदीवर 'चादर ट्रेक' पूर्ण केला आहे. विक्रमी वेळात हा ट्रेक पूर्ण करणारी गुंजन ही भारतातील सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. -20° ते -30° तापमानात तीने हा ट्रेक पूर्ण केला आहे. तिच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Gunjan Narvekar
Ranji Trophy: गोव्याचा मोठा विजय; एक डाव, चार धावा राखून सेनादलाचा पराभव

काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टचा (Mount Everest) बेस कॅम्प गुंजनने (Gunjan Narvekar) सर केला होता. गुंजनने आठ दिवसात 5,364 मीटर उंची गाठली होती. गुंजन नार्वेकर बेस कॅम्प सर करणारी सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली होती.

तिच्या या कामगिरी बद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी देखील गुंजनचे कौतुक केले होते.  'माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केल्याबद्दल गुंजनला खूप शुभेच्छा. आठ दिवसात बेस कॉम्प सर करणारी सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली आहे. गिर्यारोहणात तिला उज्वल भविष्य आहे. तिला माझ्याकडून शुभेच्छा.' असे ट्विट मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.

Gunjan Narvekar
Vasco Hit And Run Case: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, फरार तरूणाला दाबोळीत अटक

लडाखमधील जंस्कार क्षेत्रामध्ये 'चादर ट्रॅक' म्हणून एक ट्रॅक आहे. तो पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून हाच ट्रॅक गुंजनने पूर्ण केला आहे. जंस्कारा नदी थंडीमध्ये गोठते त्यामुळे अनेक लोक त्या नदीवर ट्रेकिंगचा आनंद घेतात. यामुळे जगभरामध्ये हा ट्रॅक 'चादर ट्रॅक' म्हणून प्रसिद्ध आहे.

उन्हाळ्यामध्ये ही नदी थंड पाण्याने दुथडी भरून वाहत असते. या 'चादर ट्रॅक'वर ट्रेकिंग करणे सोपे नसते. कारण आपल्या जीवाची बाजी लावून गोठलेल्या नदीवरुन हा ट्रेक करायचा असतो. हा ट्रेक करताना गोठलेल्या जंस्कार नदीच्या खालून वाहणारे पाणी स्पष्ट दिसत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com