Caculo Mall Panjim  Dainik Gomantak
गोवा

Panaji Goa: स्मार्ट सिटी पणजीत गांजाचे पीक! फुटपाथवर उगवलेल्या झाडामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ, शंका कुशंकांना ऊत

Caculo Mall Panjim News: काही लोकं हे रोप पाहून भरपूर थक्क झालेत तर इतरांना याचं नेमकं कारण स्पष्ट होत नसल्याने चिंता सतावतेय

Akshata Chhatre

पणजी: काकुलो मॉल, पणजीच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या कडेला अचानक एक गांजाचं रोप सापडल्याने सगळीकडेच खळबळ उठली आहे. परिसरात हे रोप नेमकं आलं तरी कुठून यावर विविध चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे हे रोप व्यवस्थित लक्ष देऊन उगवल्यासारखं वाढलं असल्याने कुणीतरी उगाच हे आणून टाकलंय की आपोआप उगवलं आहे हे समजत नाहीये.

व्यस्त रस्त्याच्या कडेला गांजाचे रोप आढळून आले. हे रोप व्यवस्थित वाढवलेलं आहे आणि व्यवस्थित कापून तयार केलंय. या रोपाला आजूबाजूनी फुलांनी वेढलंय. काही लोकं हे रोप पाहून भरपूर थक्क झालेत तर इतरांना याचं नेमकं कारण स्पष्ट होत नसल्याने चिंता सतावतेय.

"मी कामावर जात असताना मला हे रोप दिसलं. सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त एक विचित्र दिसणारं रोप आहे, पण नंतर मला उमगलं की ते एक गांजाचं रोप आहे मात्र मला यावर विश्वासच बसत नव्हता!" एका स्थानिकाने मत व्यक्त केलंय.

हा विचित्र प्रकार घडताच शहराच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अधिकारी हे रोप स्मार्ट सिटीच्या आवारात कसे आले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोप मुळापासून उपटून परीक्षणासाठी पाठवण्यात आलंय, त्यापूर्वी या रोपाचं वजन करून आणि आवश्यक तपासणी करून हे झाड गांजाचंच असल्याची खात्री करण्यात आली आहे. गोव्याच्या राजधानीत अचानक हा प्रकार घडला असल्याने अनेकांना प्रश्न पडलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT