Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: सासष्टी काँग्रेसचा बालेकिल्ला नाहीच; आलेक्स सिक्वेरा

Goa Congress: सासष्टीतही नुवेसह हा उमेदवार आघाडी घेईल, असा विश्र्वास कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पर्यावरण मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

Goa Congress:

एके काळी सासष्टी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता तो राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण दक्षिण गोव्यात भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल, तसेच सासष्टीतही नुवेसह हा उमेदवार आघाडी घेईल, असा विश्र्वास कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पर्यावरण मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांनी आज व्यक्त केला.

माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारतीत ते म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत सासष्टीतील आठ पैकी केवळ तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार लवकरच जाहीर होईल. केवळ भाजपच्याच उमेदवाराबद्दल एवढी चिंता का? इतर पक्षही आहेत. त्यांची चिंता करा.

उमेदवार केव्हा जाहीर करावा, हे पक्ष ठरवेल. वेळ बदललेली आहे. लोकांना कोण चांगले काम करु शकतो याची जाणीव झाली आहे. पूर्वी कधीही विकास झाला नाही, एवढा विकास गोव्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यापासून झाला असून आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा चालू आहे.

पोर्तुगीज पासपोर्ट प्रश्र्न हा जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवाचा आहे. तरी सुद्धा हा प्रश्र्न सुटावा म्हणून प्रयत्न करीत आहे. या संदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, तेव्हा मी पण उपस्थित होते. हा प्रश्र्न निश्र्चितच सुटेल, असा विश्र्वास मंत्री सिक्वेरा यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

SCROLL FOR NEXT