राज्यात कोकणीत उच्च शिक्षणही अनेकजण घेऊ लागले आहेत. पीएचडी सुध्दा करतात. पण संसदेत कोकणी अनुवादासाठी नोकरीची जाहीरात निघाल्यास गोव्यातून एकही अर्ज केला जात नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
गोव्यातील शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु गोव्यातील विद्यार्थ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यायला हवे. शिक्षणात तांत्रिक व कुशल शिक्षणाचा अंमल करायला हवा, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे व्यक्त केले.
साखळी सरकारी महाविद्यालयाजवळ गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळतर्फे सुमारे ६ कोटी रू. खर्चून उभारण्यात आलेल्या ‘वीरांगना’ या ९० खाटाच्या वसतीगृहाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, साधनसुविधा विकास महामंडळाचे संचालक गिरीश अडकोणकर, शिक्षण खात्याचे भुषण सावईकर, दत्ताराम चिमुलकर व इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, साखळीत उभारण्यात आलेल्या या मुलींच्या वसतीगृहाचा लाभ हा गोव्यातील दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना होणार आहे. परंतु या वसतिगृहाची सर्वांनी निगा राखावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध
गोव्यात उच्च शिक्षणाच्या सोयी आहेत. परंतु अभ्यासक्रमांबाबत गोवेकरांनाच माहिती नाही. बाहेरील विद्यार्थी गोव्यात येऊन शिक्षण घेऊन जातात पण आमच्या राज्यातील का नाही ? या पुढील परिस्थिती ही आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत आपले अस्तित्व राखण्यासाठी भविष्य घडवू शकणाऱ्या तांत्रिक व कौशल्य शिक्षणाचीच गरज भासणार आहे. त्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू व्हायला हवेत, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.