cancer recovery Dainik Gomantak
गोवा

Cancer Ayurvedic Treatment: कॅन्सरवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'मास्टरस्ट्रोक'; स्टेज-4 मधून 'आयुर्वेद' देणार नवी लाइफलाइन?

Stage-4 cancer cure: गोवा सरकारने कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू केला

Akshata Chhatre

पणजी: भारतातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गोवा सरकारने कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रुग्णालये एकत्र येऊन आयुर्वेदाच्या मदतीने कर्करोगावर प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

'गोवा इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी इनिशिएटिव्ह'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत झालेल्या बैठकीत 'गोवा इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी इनिशिएटिव्ह' या प्रकल्पावर चर्चा झाली. या प्रकल्पाचा उद्देश आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही उपचार पद्धतींचे एकत्रीकरण करून कर्करोगावरील उपचारांमध्ये सुधारणा करणे आणि या क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा आहे.

यासाठी गोव्यात एक संशोधन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटल उपचारांसाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) प्रदान करणार आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या डीन डॉ. सुजाता कदम आणि शल्यचिकित्सक डॉ. शेखर साळकर यांच्यासह अनेक तज्ज्ञ या बैठकीत उपस्थित होते. या प्रकल्पात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, आरोग्य सेवा संचालनालयाचा आयुष कक्ष, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाचा सहभाग असेल.

आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा प्रयोग

या संशोधनासाठी चौथ्या टप्प्यातील (स्टेज IV) कर्करोग रुग्णांची निवड केली जाईल. रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीनंतर, समान संख्येतील रुग्णांना दोन वेगवेगळ्या उपचार पद्धती - आयुर्वेद आणि ॲलोपॅथीप्रमाणे औषधं दिली जातील. प्रत्येक १५ दिवसांनी डॉक्टर वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या आधारे प्रगतीवर चर्चा करतील.

मुख्यमंत्री सावंत, जे स्वतः आयुर्वेदिक चिकित्सक आहेत, यांनी या संशोधनासाठी पुढाकार घेतला आहे. आयुर्वेदाचा कर्करोगावरील उपचारांमध्ये प्रभावी उपाय म्हणून वापर करता येतो का? आणि यामुळे उपचारांचा खर्च कमी होऊ शकतो का? याचा शोध घेणे हे त्यांचं ध्येय आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्यानंतरच आयुर्वेदाला कर्करोगावरील उपचारांमध्ये मान्यता मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT