
Goa CM Pramod Sawant Urges Schools to Avoid Beach Picnics on National Science Day 2025
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवरुन अपघाताच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (27 फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बोलताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समुद्रकिनारी पिकनिक न काढण्याचे आवाहन केले. याशिवाय, पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विज्ञानाचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
मुख्यमंत्री आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, 'मी राज्यातील तमाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांना आवाहन करतो की यापुढे समुद्रकिनारी पिकनिक काढणे बंद करा. याबाबत सर्क्युलर काढा. तुम्हाला जर पिकनिक काढायची असेल तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट ताळेगाव आणि काकोडा येथे काढा. याशिवाय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, ओल्ड गोव्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर, वास्कोमधील पोलर इन्स्टिट्यूट, दोनापावला येथील वॉटर इन्स्टिट्यूट आणि आयुष इन्स्टिट्यूट यांसारखी ठिकाणे विद्यार्थ्यांना (Students) दाखवा, ज्यामधून त्यांना प्रेरणा मिळेल.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विज्ञानाचे महत्त्व आपण जाणले पाहिजे. विज्ञानाबद्दल कोणताही संभ्रम न ठेवता त्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच, आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.