Indian Railway Konkan Railway Twitter
गोवा

Ratnagiri Madgaon: रत्नागिरी - मडगाव डेली एक्सप्रेस रद्द, 'या' तारखेपर्यंत सेवा राहणार बंद

देखभाल आणि दुरूस्तीच्या कामानिमित्त सेवा मर्यादित काळासाठी बंद राहणार आहे.

Pramod Yadav

रत्नागिरी - मडगाव - रत्नागिरी मार्गावर धावरणारी डेली एक्सप्रेस मोठ्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध करून माहिती दिलीय. या मार्गावरील देखभाल आणि दुरूस्तीच्या कामानिमित्त सेवा मर्यादित काळासाठी बंद राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

(Train no, 10101 / 10102 Ratnagiri - Madgaon Jn. - Ratnagiri Daily Express of temporary cancellation Extended)

कोकण रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मर्यादित काळासाठी बंद ठेवण्यात आलेली रत्नागिरी - मडगाव - रत्नागिरी सेवा बंद असण्याचा काळ वाढविण्यात आाला आहे. आता डेली एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे कोकण रेल्वेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी - मडगाव - रत्नागिरी या मार्गावरील दुरूस्ती आणि देखभाल करण्याचे काम केले जाणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

तसेच, रोहा - चिपळून - रोहा ही मेमू स्पेशल देखील 09 ते 12 मार्च या काळात बंद ठेवण्यात आली आहे. यामाध्ये Train No. 01597 आणि 01598 दोन्ही बंद राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात विरोधक एकत्र येऊ शकतील?

Goa Bad Roads: खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का? संपादकीय अग्रलेख

Mandrem: मांद्रेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण! वाहनचालकांची होतेय कसरत; डिसेंबरनंतर होणार हॉटमिक्स डांबरीकरण

Bardez: बार्देशमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव! अपघातांत वाढ; शेतपिकाचेही होतेय मोठ्या प्रमाणात नुकसान

Russian Tourist: ..यंदा रशियन पर्यटक वाढणार? व्‍यावसायिकांची अपेक्षा; नेदरलँड, पोर्तुगाल, स्‍पेन आणि युकेकडेही लक्ष

SCROLL FOR NEXT