Siolim
Siolim Dainik Gomantak

धक्कादायक! शिवोलीत गोमांसाठी दोन गाईंची कत्तल? परराज्यातील कामगारांचे कृत्य

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
Published on

शिवोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोमांसाठी दोन गाईंची कत्तल केली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवोलीत परराज्यातील कामागारांनी दोन गोमांसाठी दोन गाईंची कत्तल केली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. स्थानिकांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या कामागरांना शोधून काढले व घडलेल्या घटनेबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी गाईंची कत्तल केल्याची कबुली दिली. तसेच, गाईंचे काही प्रमाणात मांस त्यांनी नातेवाईकांना देखील दिल्याचे कामगार या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

स्थानिकांनी गाईंची कत्तल का केली असा प्रश्न विचारला असता, चुकून आमच्या हातून ही घटना घडली असे उत्तर या कामगारांनी दिले. दरम्यान, घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Siolim
गोव्यात कॉलगर्ल्सकडून मारहाण झालेला मध्यप्रदेशचा 'तो' माजी मंत्री भाजपचा? काँग्रेस विरोधात FIR दाखल

स्थानिकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. पोलिसांनी अथानास लकडा व मनबत्ताल इक्का (रा. मूळ छत्तीसगड) असे दोघांना अटक केली आहे.

रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये गाईंची कत्तल केल्यानंतर तिच्या मांसाचे तुकडे घेऊन जाताना संशयित कामगार दिसत आहेत. असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे स्थानिक संतप्त झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com