Mallikarjun Temple canacona Dainik Gomantak
गोवा

Mallikarjun Temple: श्री मल्लिकार्जुन देवस्थानची जमीन हडपण्याचे कारस्थान! महाजनांचा आरोप; मामलेदारांना दिले निवेदन

Mallikarjun Temple Canacona: २७ जुलै रोजीच्या महाजनी बैठकीत क्लबतर्फे बोलावून घेतलेल्या महाजनी युवकांनी मागणीला विरोध केलेल्या अन्य महाजनांना लक्ष्य करून धुडगूस घातला.

Sameer Panditrao

आगोंद: काणकोण तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या मालकीची फसगाळ, पाटणे येथील जमीन हडपण्याचे काहींचे कारस्थान चालल्याचा आरोप करून महाजनांनी सदर जमिनीला संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन देवालय प्रशासक तथा मामलेदार गजेश पी. शिरोडकर यांना देण्यात आले.

देवस्थानच्या मालकीची जमीन भाडे पट्टीवर (लीजवर) देण्यात यावी, अशी तिसऱ्यांदा केलेली मराठा वॉरियर्सची मागणी, देवस्थानच्या २७ जुलैच्या महाजनी बैठकीत बहुमताने धुडकावून लावली असता गोंधळ घालून एका महाजनांच्या अंगावर धावून आल्यानंतर झालेल्या गोंधळाची नोंद घेऊन, सदरच्या जमिनीला संरक्षण द्यावे, असे निवेदन देवालय प्रशासक तथा मामलेदार शिरोडकर यांना देवस्थानच्या महाजनांनी दिले.

यावेळी देवस्थानचे माजी अध्यक्ष विठोबा देसाई, अनिल नाईक गावकर, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या केंद्रीय समिती सचिव दिप्तेश देसाई, देवस्थान समितीचे पदाधिकारी महाबळेश्वर देसाई, समीर देसाई, ज्येष्ठ महाजन प्रकाश देसाई, विजयनाथ भैरेली, लायन्सचे अध्यक्ष पंकज नाईक गावकर व अन्य उपस्थित होते.

२७ जुलै रोजीच्या महाजनी बैठकीत क्लबतर्फे बोलावून घेतलेल्या महाजनी युवकांनी मागणीला विरोध केलेल्या अन्य महाजनांना लक्ष्य करून धुडगूस घातला. त्यामुळे ही बैठक तहकूब करावी, ही मागणी समिती अध्यक्षांनी मान्य केली नाही व त्यातच पदाधिकारी रजिस्टर घेऊन तिथून गेले, असे माजी अध्यक्ष देसाई यांनी सांगितले.

रजिस्टरमध्ये काय नोंद; कळले नाही!

बैठक तहकूब न करताच गेल्यामुळे, त्यानंतर ह्या लोकांनी रजिस्टरवर काय नोंद केली, तेही कळू शकले नाही. कोणताही निर्णय झालेला नाही, रेकोर्डींग झालेले नाही,अशावेळी प्रशासक व मामलेदार यांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी श्री देसाई व अन्य महाजनांकडून करण्यात आली आहे.

१०० कोटींहून अधिक किमतीची जमीन

सदर ४३ हजार ७२३ चौ.मी. ही महत्त्वाची जमीन असून आजघडीला रु.१०० कोटी पेक्षा जास्त किंमतीची आहे, ती पाटणे समुद्र किनारा व महामार्गाला जवळ आहे. पारंपरिक देव कृत्ये या ठिकाणी चालू आहेत. ही जमीन सोडून अन्यत्र असलेली जमिनीसंदर्भात विचार करता येईल, असे महाजनांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, एका क्रिकेट क्लबच्या वतीने ह्या जमिनीकरता तिसऱ्यांदा मागणीच नव्हे तर आग्रह होत आहे, असे पत्रकारांशी महाजनांनी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

Goa Eco-Tourism Policy: पेडणे ते काणकोण... निसर्गाचा अनमोल ठेवा आता पर्यटकांसाठी खुला! 'इको-टुरिझम' धोरण ठरणार गेमचेंजर; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Goa LPG Cylinder: गोव्यात गॅस सिलिंडरचा किती आहे साठा? CM सावंतांनी दिले दिलासादायक उत्तर; अतिरिक्त पुरवठ्याचीही होणार व्यवस्था

Ghodemodni: 'बोला पुंडलिक वर दे..'! अभूतपूर्व जल्लोषात सर्वणची घोडेमोडणी साजरी; शेकडो नागरिकांची उपस्थिती

Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

SCROLL FOR NEXT