Ramesh Tawadkar minister post Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: जल्लोष! फटाके, शुभेच्छांनी वातावरणाने दणाणले; मंत्रिपद मिळाल्याने प्रियोळात 'तवडकरांचा' होणार भव्य सत्कार

Ramesh Tawadkar minister: कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले. अनेकांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तवडकरांना मंत्रिपद मिळाल्याने प्रियोळ परिसर उत्सवाच्या वातावरणाने दणाणून गेला.

Sameer Panditrao

खांडोळा: काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळाल्याची बातमी समजताच माशेल, बाणास्तरी व भोम परिसरात उत्साहाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले. अनेकांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तवडकरांना मंत्रिपद मिळाल्याने संपूर्ण प्रियोळ परिसर उत्सवाच्या वातावरणाने दणाणून गेला.

माशेल येथे तवडकरांचे समर्थक विनय गावकर यांनी बाजारपेठेत फटाके लावून जल्लोष केला. भोम व बाणास्तरी येथेही युवकांनी मोठ्या उत्साहात तवडकरांच्या निवडीचे स्वागत केले.

जवळपास ७० कि.मी. अंतरावर असलेला काणकोण मतदारसंघ आणि प्रियोळ यांचा थेट संबंध नसला तरी तवडकरांचे येथे लक्षणीय संख्येने समर्थक आहेत. त्यामुळे तवडकर प्रियोळमधील कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहतात.

श्रम-धाम योजनेतून त्यांनी काही गरजू कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली असून भविष्यात आणखी घरांचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे तवडकरांविषयी प्रियोळवासीयांमध्ये विशेष आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.

तवडकरांचा होणार सत्कार

तवडकर यांच्या मंत्रिपदाच्या नियुक्तीचा आनंद व्यक्त करण्यासाठी लवकरच प्रियोळ मतदारसंघात त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला जाणार असून यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. या सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील.

कामत, तवडकरांना सरकारकडून मंत्रिपदाची पावती

कामतआणि रमेश तवडकर दोघेही ज्‍येष्‍ठ आमदार आहेत. त्‍यांना कामाचाही अनुभव आहे. त्‍यामुळे मंत्रिपदे देऊन सरकारने त्‍यांना योग्‍य पावती दिली, अशी प्रतिक्रिया आमदार संकल्‍प आमोणकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सरकारच्‍या निर्णयावर आपण नाराज नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. कामत आणि तवडकर ज्‍येष्‍ठ आमदार असल्‍याने सरकारने त्‍यांना त्‍याची पावती दिली. आपले ध्‍येय मुरगाव मतदारसंघाचा विकास हेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Taxi Policy: गोव्यात लवकरच नवीन 'टॅक्सी धोरण', 10 सप्टेंबरपर्यंत मसुदा तयार करण्याचे मुख्यमंत्री सावंतांचे निर्देश; बैठकीनंतर अखेर तोडगा

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात, काणकोणात क्रीडांगणाचं केलं उद्‌घाटन, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

Navpancham Rajyog 2025: 27 ऑगस्टपासून 'या' राशींसाठी 'शुभ काळ' सुरू, शुक्र बनवणार शक्तिशाली राजयोग; आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT