Ambulance Goa Dainik Gomantak
गोवा

Canacona Health Centre : काणकोण आरोग्य केंद्र; रुग्णवाहिका असूनही वापरली जाते भाड्याची गाडी

Canacona Health Centre :

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Health Centre :

काणकोण, सामाजिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दारात उभी असताना कोणाच्यातरी फायद्यासाठी भाड्याची गाडी वापरण्यात येत आहे, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.

बुधवारी लसीकरणासाठीची सामग्री आणण्यासाठी रुग्णवाहिका चालक कामावर हजर झाला नाही. ही नित्याचीच बाब झाली असून यासंदर्भात तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही, असे आरोग्य कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

माशे येथे अपघात झाला त्यावेळी जखमींना जिल्हा इस्पितळात नेण्यासाठी नादुरुस्त रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला व त्या रुग्णवाहिकेचे मडगावला ब्रेक निकामी झाले, अशी माहिती पुढे आली आहे.

मात्र, यासंदर्भात काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी मौन पाळून आहेत. यापूर्वी काणकोण उपजिल्हाधिकारी मधु नार्वेकर यांनी काणकोण आरोग्य कल्याण समितीचे सदस्य, नागरिक व सरकारी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती.

या बैठकीत काणकोण आरोग्य कल्याण समितीच्या सदस्यांनी काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात चाललेला अनागोंदी कारभार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन आठवड्यातून एकदा तरी मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक आरोग्य केंद्राला भेटदेऊन पाहणी करण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT