South Goa: 48 तासांत उत्तर द्या! निवडणूक अधिकार्‍याने आप आमदाराला कारणे दाखवा नोटीस का बजावली?

South Goa: येत्या 48 तासांत उत्तर न दिल्यास त्यांच्यालविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
MLA Venzy Viegas
MLA Venzy ViegasDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Venzy Viegas

दक्षिण गोव्यातील बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्याने कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. व्हिएगस यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

येत्या 48 तासांत उत्तर न दिल्यास त्यांच्यालविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

गोव्यात आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. दक्षिणेतून काँग्रेसने विरियातो फर्नांडिस यांच्या उमेदवारीची घोषणा केली असून, व्हिएगस सध्या विरियातो यांचा प्रचार करत आहेत. यासाठी मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या जात आहेत.

व्हिएगस यांनी कुडचडे येथील छत्रपती शिवाजी वर्तुळ येथे सहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सभा घेतली. या सभेला त्यांनी स्पीकरव्दारे संबोधित केले. पण, यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवानगी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

MLA Venzy Viegas
Heatwave Alert In Goa: काळजी घ्या! पुढचे सात दिवस सूर्य आग ओकणार, गोवा सरकारची ॲडव्हायझरी प्रसिद्ध

व्हिएगस यांच्या कुडचडेतील सभेबाबतची माहिती भरारी पथकाकडून कुडचडेतील सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना देण्यात आली. अहवालानुसार, निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांनी व्हिएगस यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

48 तासांत उत्तर द्या!

व्हिएगस यांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली असून, उत्तर न दिल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, हा प्रकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप व्हिएगस यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com