Canacona Fish Market Dainik Gomantak
गोवा

Canacona Fish Market: काणकोण ‍मासळी बाजार गलिच्छ! गटारात अळ्या; रोगराईची भीती, विक्रेते रस्त्यावर; नागरिक संतप्त

Canacona Fish Market Unhygienic Conditions: चावडी-काणकोण येथील नगरपालिकेच्‍या मासळी मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. तेथील गटारात तर अळ्‍यांचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आगोंद: चावडी-काणकोण येथील नगरपालिकेच्‍या मासळी मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. तेथील गटारात तर अळ्‍यांचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे.

काणकोण बाजारपेठ ही परिसरातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानली जाते. स्वच्छता आणि बाजार व्यवस्थापनातील प्रयत्नांबद्दल २०२२ मध्ये काणकोण नगरपालिकेच्या तत्कालीन अध्यक्षांचा गौरवही झाला होता. मात्र, आज त्याच बाजारपेठेतील मासळी मार्केटची दुरवस्‍था झाली आहे.

काणकोण पालिकेच्या माजी अध्यक्षा सुलोचना गावकर यांनी सांगितले की, मासळी व भाजी मार्केटची अवस्था चिंताजनक असून, या विषयावर पालिकेच्या बैठकीत अनेकदा चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.

मासळी मार्केटमध्ये आवश्यक स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा आणि देखभाल याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून, सांडपाणी वाहून नेणारी गटारे तुंबल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

बाजारातील अंतर्गत भाग असुरक्षित आणि आरोग्यघातक बनल्याने अनेक विक्रेत्यांना राष्ट्रीय महामार्ग-६६ लगत तसेच मोकळ्या जागेत मासळी विक्री करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढला आहे, असेही गावकर यांनी सांगितले.

माजी नगरसेवक धीरज गावकर यांनी निदर्शनास आणले की, चावडी, नगर्से आणि चार-रस्ता उड्डाणपुलाजवळ मासळी विक्रेते रस्त्याकडेला व्यवसाय करत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सुमारे ३.६ ते ४ कोटी रुपये खर्चून सुमारे २०० विक्रेत्यांची क्षमता असलेले नवे आधुनिक मासळी मार्केट उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी नवीन इमारतीपेक्षा विद्यमान बाजाराची तातडीने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

पालिकेने यापूर्वी बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई व स्वच्छता राखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेवतु, जयराम, सुखांती आणि इतर मासळी विक्रेत्यांनी संताप व्यक्त करताना, पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला, तरी प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT