Canacona Construction Workers Dainik Gomantak
गोवा

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Goa minimum Wage Construction Workers: वेतन फलकाचे उदघाटन रविवारी चावडी-काणकोण येथे कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

चावडी: काणकोण तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतनाचे दर निश्चित केले असून, यासंदर्भातील किमान वेतन फलकाचे उदघाटन रविवारी चावडी-काणकोण येथे कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानुसार गवंड्यांसाठी दररोज १२०० रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी ८०० रुपये, तर महिला मजुरांसाठी ६०० रुपये किमान वेतन निश्चित केले आहे. हे दर मजूर, कंत्राटदार, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निश्चित केल्याचे मंत्री तवडकर यांनी सांगितले. निर्धारित दरापेक्षा अधिक मजुरीची मागणी केल्यास संबंधित मालकाने ग्रामपंचायत किंवा पालिका कार्यालयात तक्रार करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कंत्राटदार आणि कामगारांसाठी कामाच्या वेळेसह विविध नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार कामाची वेळ सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, दुपारी १ ते २ या वेळेत भोजनाची सुट्टी राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, पान, गुटखा खाऊन थुंकणे तसेच धूम्रपान करण्यास मनाई आहे. कोणाकडे चरस, गांजा व अमली पदार्थ आढळल्यास किंवा संबंधित व्यक्ती गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

सर्व कंत्राटदार आणि कामगारांनी संबंधित प्राधिकरणाने निश्चित केलेले नियम, कायदे तसेच किमान वेतनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत देसाई, पोलिस निरीक्षक थेरॉन डिकॉस्टा, माजी नगरसेवक हेमंत नाईक गावकर, गंधेश मडगावकर, सायमन रिबेलो, दिवाकर पागी, पंचसदस्य आनंदू देसाई आणि नागरिक उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी गर्दीस मनाई

सर्व कामगारांची भाडेकरू पडताळणी पूर्ण असणे आवश्यक असून, ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपालिका कार्यालयात नियमानुसार नाममात्र शुल्क भरून नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. कंत्राटदारांनी कामगारांची उपस्थिती नोंद ठेवावी, तसेच कामगारांनी निर्धारित ठिकाणीच एकत्र यावे, असे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

काणकोणात मजुरांची संख्या कमी असल्याने काही वेळा मनमानी पद्धतीने अधिक मजुरीची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी सर्वांसाठी स्पष्ट व योग्य किमान वेतन दर निश्चित केले आहेत.

रमेश तवडकर,कला व संस्कृती मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

BRICS India: सेतू बांधला, पण 'किंतु-परंतु' कायम! ब्रिक्समध्ये भारताचा राजनैतिक प्रभाव वाढला; मात्र चीन-रशियासोबतची प्रचंड व्यापारतूट ठरतेय मोठे आव्हान

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

SCROLL FOR NEXT