Goa Politics: गिरीश चोडणकरांच्या पोस्टवर उत्तराखंड पोलिसांचा डोळा! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा; पोस्ट हटविण्याची 'एक्स'कडे मागणी

Girish Chodankar X post: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या ‘एक्स’ खात्यावरील एका पोस्टने थेट उत्तराखंड पोलिसांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Girish Chodankar X post
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या ‘एक्स’ खात्यावरील एका पोस्टने थेट उत्तराखंड पोलिसांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टने भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा करत ती हटविण्याची मागणी उत्तराखंड पोलिसांनी ‘एक्स’कडे केली आहे.

त्यामुळे गोव्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप आता थेट राज्याच्या सीमा ओलांडून पोलिसांच्या दारात पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चोडणकर यांनी ‘राष्ट्रीय सकल विकासदराची खरी गोष्ट’ नावाचा एक व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. प्रत्यक्षातील विकासदर कमी असताना सरकारने तो जास्त दाखवल्याची चर्चा त्या व्हिडिओत करण्यात आली आहे. त्यावरून ही कारवाई सुरू झाली आहे.

Girish Chodankar X post
Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

या संदर्भात ‘एक्स’ने चोडणकरांना पाठविलेल्या पत्रात उत्तराखंड पोलिसांकडून त्यांच्या खात्याविरोधात विनंती प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित सामग्री कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा पोलिसांनी केल्याचेही ‘एक्स’ने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ‘एक्स’ने ही माहिती वापरकर्त्याला देत त्याला कायदेशीर सल्ला घेण्यापासून न्यायालयात आव्हान देण्यापर्यंतचे पर्याय खुले असल्याचे सांगितले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसकडून सरकारविरोधात सातत्याने सोशल माध्यमांवरून टीकेची धार वाढविली जात असताना, आता चोडणकरांच्या एका पोस्टवरच परराज्यातील पोलिसांनी आक्षेप घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Girish Chodankar X post
Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

पोस्ट नेमकी कोणत्या मुद्द्यावरून आक्षेपार्ह ठरली, त्यात कोणत्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा आहे आणि उत्तराखंड पोलिसांनी कोणत्या आधारावर ही मागणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Anjali Nimbalkar Vijay Sardesai Post
Goa Politics
 Girish Chodankar Petition
Headland Postal Department Property
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com